शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक क्लबआडून जुगार फार्मात

By admin | Updated: March 18, 2017 01:05 IST

उपनगरात वाढते प्रस्थ : कारवाई करण्यात अडचणी, बेकायदेशीरपणे लाखोंची उलाढाल

अमर पाटील--कळंबा --शहरातील टिंबर मार्केट परिसरात दोन रमी क्लब, साळोखेनगरातील रमी क्लब, संभाजीनगर पेट्रोलपंपालगतच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळात चालणारा रमी क्लब, कळंबा मुख्य रस्त्यालगतचा रमी क्लब याखेरीज उपनगरातील खुल्या मैदानासह उद्यानात, रिकाम्या बंगल्यात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रमीचे डाव जोरात चालू आहेत. रमी हा मनोरंजक खेळाचा प्रकार असल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे पोलिस खाते सुद्धा हतबल बनले आहे; परंतु बहुतांशी ठिकाणी रमी आडून बेकायदेशीर बल्लारी, प्लस, तीन पानी सारख्या डावातून रोजची लाखांची उलाढाल होणारे डाव रंगत आहेत. ज्यात उपनगरातील युवावर्ग भरडला जात असून, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.पोलिसी कारवाईस चकवा देण्यासाठी दहा ते पंधरा सभासद एकत्र येऊन कला, क्रीडा, सांस्कृतिक क्लब स्थापन करतात. ज्यास्ााठी शासनाच्या धर्मादाय कार्यालयाची कायदेशीर परवानगी घेतली जाते; पण याच सांस्कृतिक क्लबच्या भिंतीआड रमीच्या डावासोबत इतर डाव मोठ्या प्रमाणात रंगतात. अशा क्लबमध्ये खेळायला गेलेला व्यक्ती मात्र खिसे रिकामे होऊनच बाहेर पडतो. रमीआडून काही ठिकाणी बल्लारी प्लसचे डाव रंगतात. अशा प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.समाज विधायक कार्यासाठी स्थापित या क्लबमध्ये रमीसाठी मासिक मेंबर किंवा दिवसाचे टोकण देऊन कसून तपासणी करून आत घेतले जाते. क्लब पूर्णत: सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवला जातो. धाड पडल्यानंतर दाखवायचे फुटेज वेगळेच ठेवले जाते. रमी खेळणाऱ्यांची नाष्ट्यासह खाण्या-पिण्याची बडदास्त ठेवली जाते. सभासदांना मेंटेनन्सही द्यावा लागतो. परिसरातील नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे येऊ नये यासाठी काहीजणांनी हिंस्र कुत्री व फाळकुटदादाही ठेवले आहेत. त्यामुळे अशा क्लबविरोधात तक्रारी होत नाहीत. हळूहळू रमीची वाटचाल बल्लारी व प्लसच्या लाखोंच्या उलाढाली करणाऱ्या डावांकडे वळली आहे. जे शोधणे व त्याचा बीमोड करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.यात क्लबमालकास स्वत:ला मोठा फायदा होतो. पोलिसी कारवाईचा ससेमिरा मागे नको म्हणून क्लबमध्ये समाज विधायक उपक्रमांसह रमीचे रेकॉर्डही व्यवस्थित ठेवले जाते. स्थानिक नागरिकांनी तक्रार करू नये, यासाठी ‘ना हरकती’च्या सह्यांची मोहीम समाज विधायक उपक्रमाआडून राबविली जाते. यातूनही पोलिसांनी अचानक कार्यवाही केल्यास सरळ पोलिसी नाहक त्रासाविरुद्ध हायकोर्टातून स्टे आणला जातो.मनोरंजक डावाआडून पैशांचा डावरमीआडून बऱ्याच बेकायदेशीर क्लबमध्ये बल्लारी, प्लस, तीन पानी जोरात सुरू आहे. जे शोधणे पोलिस खात्यास आव्हान आहे. कुटुंबासह समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या या जुगाराचा शोध घेऊन त्याचा बीमोड करावा, ही मागणी आता जोर धरत आहे.