शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलावात सापडला शाहूपूर्वकालीन पाण्याचा पाट

By admin | Updated: April 10, 2016 01:01 IST

पाट पाहण्यासाठी लोकांची गर्दी

कळंबा : येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना असलेल्या शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला. हा पाट पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली. महापौर अश्विनी रामाणे व उपसरपंच दीपक तिवले यांनी गाळ काढण्याचे काम थोडावेळ थांबवून पाट रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. चुनखडीच्या बांधकामातील दोन बाय दोन फूट लांबी-रुंदीचा अतिशय सुंदर घडण असलेला हा पाट आहे. तलावाच्या इतिहासात प्रथमच यंदा पाऊसमान कमी झाल्यामुळे तलाव पूर्णत: आटला आहे. म्हणून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंपदा विभागातर्फे गाळ काढण्याचे काम गेली तीन आठवडे सुरू आहे. दुपारी पोकलँडच्या साहाय्याने गाळ उपसा सुरू असताना चालक कुमार गोरंबेकर यांना हा पाट दिसून आला. त्यांनी ही माहिती उपसरपंच दीपक तिवले यांना दिली. शाहूपूर्वकालीन असलेला हा पाट गाळाच्या खाली सात फूट ढिगाखाली होता. हा पाट आजही मजबूत व पाणी वाहून जाईल, असा आहे. त्यामध्ये पाणी होते. त्यास खापरी नळ योजना, असेही म्हटले जाते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्यायनी मंदिराच्या पिछाडीस अमृत, राम, परशुराम ही कुंडे आहेत. ज्यातील पाणी प्रदूषणविरहित असे. कोल्हापुरात १७६० साली २१ तळी होती; पण नागरी प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नव्हते. रंकाळ््याचे पाणी पिण्यास चांगले होते; परंतु पूर्ण क्षमतेने शहरात पुरवठा करता येत नव्हता. पुण्याच्या बाबूराव केशव ठाकूर या व्यापाऱ्याची महालक्ष्मीवर श्रद्धा होती. शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन त्यांनी कात्यायनीतील कुंडातील हे पाणी पाटाद्वारे शहरात आणण्याची योजना आखली. तीन लाख रुपये खर्च करून हे पाणी नळावाटे महालक्ष्मी मंदिरातील दोन हौदात व शहरात ३२ विहिरींमध्ये सोडले होते. तोच हा पाट सापडल्याने अडीचशे वर्षांपूर्वीच्या इतिहासास उजाळा मिळाला. तलावात पाट सापडल्याचे दुपारी गावात समजताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. पाट बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. घटनास्थळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आदींनी भेट दिली व पाटाची माहिती घेतली.