शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पालमध्ये चाऱ्यासाठी ऊस कापला; जनावरेही विकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:52 IST

श्रीकांत ºहायकर । लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा ...

श्रीकांत ºहायकर ।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा खजिना’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती पावलेल्या राधानगरी तालुक्यात पाणीटंचाईच्या प्रचंड झळा बसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजूस असणाºया धामोड परिसरातील बहुतांशी वाड्या-वस्त्यांवर टंचाई आहे. पाल बुद्रुकचा पाणीप्रश्न तर ‘रात्रंदिन आम्हा पाणीयुद्धाचा प्रसंग’ अशा बनला आहे. पाण्याअभावी लोकांनी कवडीमोल दराने जनावरे विकली आहेत. काही शेतकऱ्यांनी हाताशी आलेली ऊसपिके चाºयासाठी कापली आहेत.साधारणत: ५०० लोकवस्ती असणारे गाव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. या गावासाठी दहा वर्षांपूर्वी ‘केकतीचा झरा’ नावाच्या ओढ्याजवळून गावाशेजारील टाकीत सायफनने पाणी टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले; पण गेल्या ४० ते ५० वर्षांत पहिल्यांदाच ह्या झºयाचे पाणी यावर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून आणत आहेत. ऊसपीक तर हातचे केव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्थ आणि जनावरांना या भीषण टंचाईस गेल्या एक महिन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आम्हाला झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी टाहो फोडणारे नागरिक करत आहेत. वेळोवेळी पाणीप्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवत केवळ मतांचे राजकारण करणाºयांना येथील नागरिकांनी पाण्यासाठी वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत; पण ही निवेदने धूळखात पडल्याची परखड भावना काही महिलांनी बोलून दाखवली.पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेऊन गावकºयांनी ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा करत दोन कूपनलिका खोदल्या; पण या कूपनलिकांना पाणी लागले नाही म्हणून पुन्हा एकदा प्रत्येक कुटुंबाला १४०० रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसांत पुन्हा दुसरी कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे होऊनही या समस्येकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.संतप्त झालेले गावातील नागरिक आता एकवटले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी आणि ठोस निर्णय तातडीने घेण्याची मागणी होतआहे.