शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विरोधकांचे राजकारण हाणून पाडा

By admin | Updated: July 9, 2015 00:27 IST

आवाडे यांचे आवाहन : इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीत वह्या वाटप कार्यक्रम

इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये विरोधकांकडून फक्त राजकारणच केले जात आहे. गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या नागरी सेवा-सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. झोपडपट्टीवासीयांची पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेली घरकुले आता पूर्णावस्थेत असून, त्याचा योग्य लाभार्थ्यांना ताबा मिळण्यासाठी झोपडपट्टीवासीयांनी आंदोलन करावे, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.इचलकरंजी शहर कॉँग्रेस समिती व नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी कामगार कल्याण ट्रस्ट आणि जवाहर सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री आवाडे बोलत होते. आपल्या भाषणामध्ये आवाडे यांनी ‘अच्छे दिन’ आणू पाहणाऱ्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली. कॉँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या अनेक विकासकामांना मोडता घालून प्रत्येक कामात राजकारण आणले जात आहे आणि सर्वसामान्यांना दूर लोटले जात आहे, अशी टीका केली.सुरुवातीला कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विलास गाताडे, शामराव कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, चंद्रकांत इंगवले, नगरसेवक बाळासाहेब कलागते, पाणी पुरवठा सभापती रवी रजपुते, संजय केंगार, शेखर शहा, महावीर कुरुंदवाडे, अमृत भोसले, शेखर हळदकर, आदी उपस्थित होते. शेवटी पांडुरंग पिसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अविश्वास ठरावासाठीजोरदार तयारी करावीनगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणून हा प्रस्ताव बहुमताने यशस्वी व्हावा, यासाठी जोरदार तयारी करावी, असे आवाहन आवाडे यांनी केले. त्यामुळे बिरंजे यांच्यावरील अविश्वास आणण्यासाठी कॉँग्रेसने वेगाने हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळाले.