शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तोंडात अडकलेला गळ काढून वाचविले मगरीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:50 IST

कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी हौशी मच्छिमारांनी टाकलेला गळ मगरीच्या घशात अडकला. त्या मगरीवर कोल्हापुरातील डॉ. गिरीश कुलकर्णी ...

कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी हौशी मच्छिमारांनी टाकलेला गळ मगरीच्या घशात अडकला. त्या मगरीवर कोल्हापुरातील डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी यशस्वी उपचार करून त्या मगरीचे प्राण वाचविले.कृष्णा नदीच्या पात्रात काही हौशी मच्छिमारांनी मासेमारीसाठी मोठे लोखंडी गळ टाकले होते. त्यात माशांऐवजी चक्क चार फुटी मगरच गळाला लागली. भीतीपोटी तेथेच गळ आणि दोरा टाकून ते युवक पळून गेले. ही बाब शेडशाळ (ता. शिरोळ) येथील शरद पवार या युवकाने पाहिली व वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावर वाईल्डचे देवेंद्र भोसले, आशुतोष सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीकडे प्रयाण केले. तेथे पोहोचल्यावर मगरीच्या घशात हा गळ अडकला होता. तत्काळ ही बाब हातकणंगले येथील वन अधिकारी घनश्याम भोसले, सागर पोवार यांना फोनद्वारे कळविले. तेही तेथे दाखल झाले. मगरीची परिस्थिती पाहून तिला कोल्हापुरातील डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉ. कुलकर्णी यांनी मगरीवर तत्काळ वनअधिकाऱ्यांसमोरच उपचार केले.काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर तिच्या घशातील गळ काढण्यात डॉक्टरांना यश आले. काही तासांच्या उपचारानंतर पुन्हा वनअधिकाºयांकडून कृष्णानदीच्या पात्रात मगरीला सोडण्यात आले.मगरीला वाचविण्यासाठीराहुल मंडलिक, सौरभ कोकाटे,यश शिर्के, सावन कांबळे,प्रमोद पाटील, अवधूत पाटील,रोहित शिर्के याकोल्हापुरातील युवकांचे योगदान लाभले.