शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

गर्दीमुळे विरोधकांच्या अपप्रचाराला चपराक

By admin | Updated: October 26, 2016 22:27 IST

महाराष्ट्रासह कर्नाटकातीलही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित ऊस परिषद ठरली उच्चांकी

जयसिंगपूर : मंगळवारी जयसिंगपूर येथे अग्रगण्य संख्येत ऊस परिषद पार पडली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पहिली उचल ३२०० रुपये द्या, या मागणीसाठी ऊस परिषदेत रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानीकडून आतापर्यंत चौदा ऊस परिषद घेण्यात आल्या. मात्र, १५ व्या ऊस परिषदेसाठी उच्चांकी गर्दी झाल्याने विरोधक व सोशल मीडियावरती फिरणाऱ्या चुकीच्या मेसिजना मूठमाती मिळाली आहे. गेल्या महिनाभरापासून २५ आॅक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती. तसेच या ऊस परिषदेत एफआरपीचा मुद्दा नसल्यामुळे या ऊस परिषदेत फक्त दराचा निर्णय असल्यामुळे या ऊस परिषदेला गर्दी होणार नाही, असे मत जाणकार व्यक्ती व विविध राजकीय पक्षांकडून व सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजू शेट्टी, कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा, सांगली, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्हे तसेच कर्नाटकच्या सीमा भागात ऊस परिषदेच्या बैठका घेऊन परिषदेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठका, मेळावे, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंगळवारी ऊस परिषदेच्या दिवशी दुपारपर्यंत ऊस परिषदेला महत्त्व नाही. तसेच भाजप सत्तेत स्वाभिमानी हा मित्रपक्ष असल्याने आता काय दर मागणार आहेत. जादा ऊसदर मागणी होणार नाही आणि उत्साह कमी असल्याचे सोशल मीडियावर मेसेज फिरत होते. मात्र, महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या घामाचा दाम मिळविण्यासाठी परिषदेला हजर राहिल्याने विरोधक व सोशल मीडियाच्या संदेशाना मूठमाती मिळाली आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’चा अंदाज खरास्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १५ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. याबाबतचे दैनिक ‘लोकमत’ने रविवारी (दि.२३) ‘ऊस परिषद ठरणार उच्चांकी’ या मथळ्याखाली शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. या अनुषंगाने मंगळवारी (दि.२५) झालेल्या ऊस परिषदेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील शेतकरी उच्चांकी संख्येने उपस्थित राहिल्याने ‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला आहे.