शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

वसंतदादा कारखान्याच्या दारी देणेकऱ्यांची वसुलीसाठी गर्दी

By admin | Updated: April 2, 2017 23:39 IST

अडचणी वाढल्या : भाडेतत्त्वावर कारखाना देताना कसरत

सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर शासकीय, निमशासकीय संस्था, बँका, शेतकरी, कामगार अशा अनेक देणेकऱ्यांची वसुलीसाठी गर्दी झाली आहे. देणेकरी वाढल्याने कारखाना चालविण्यास इच्छुक असलेल्या संस्थेला आर्थिक कसरत करावी लागणार आहे. वसंतदादांनी उभारलेला हा कारखाना सध्या तोट्यात आहे. वसंतदादांचे नातू विशाल पाटील सध्या कारखान्याचे अध्यक्ष असले तरी, त्यांनीच हा कारखाना भाडेतत्त्वावर सक्षम कारखान्यास देण्याची शिफारस केली आहे. सांगली जिल्हा बँकेने त्यासाठीच्या हालचाली सुरू केल्यानंतर सर्वच देणेकऱ्यांनी त्यांच्या रकमा वसूल करण्यासाठी धडपड चालविली आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क, महापालिका, शेतकरी, कामगार, सभासद, जिल्हा बँक अशा सर्वच संस्थांनी त्यांचे हिशेब करून रकमेची मागणी सुरू केली आहे. देण्यांची ही रक्कम आता तीनशे कोटींच्या वर गेली आहे. त्यामुळे वसंतदादा कारखाना चालविण्यास इच्छुक असलेल्या संस्थेस त्याची तजवीज करावी लागणार आहे. कारखान्यावर यापूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करताना, थकबाकीपोटी साखर गोदाम सील केले होते. महापालिकेने एलबीटीच्या ३ कोटी ८० लाखाच्या आणि घरपट्टीच्या १६ लाखांच्या थकबाकीसाठी वसंतदादा कारखान्याची इमारत सील केली आहे. जिल्हा बँकेने ९० कोटी ५५ लाख ४६ हजाराच्या थकबाकीसाठी कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. अशा सर्व आर्थिक चक्रव्यूहात अडकलेला हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, देणेकऱ्यांची देणी भागविताना मोठी आर्थिक कसरत होणार आहे. जिल्हा बँकेमार्फत कारखान्याची निविदा प्रसिद्ध होणार असल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग व महापालिकेमार्फत बँकेला नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बँकेने सर्वांची देणी देण्याबाबत कोणतीही लेखी हमी घेतलेली नाही. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सहकार विभागाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहेत देणी... जिल्हा बँक ९0,५५,४६,000महापालिका ३,९६,00,000कामगार ४0,00,00,000ऊसबिल२0,00,00,000सेंट्रल एक्साईज १0,00,00,000बँक आॅफ इंडिया ३0,00,00,000विक्रीकर १४,00,00,000ठेवी ८0,00,00,000(यातील काही आकडे हे संबंधितांचे दावे आहेत)देण्यांबाबत वादप्रत्येकाने देण्यांबाबत दावा केला असला तरी, कारखाना प्रशासन आणि दावेदारांमध्ये आकडेवारीवरून वाद आहेत. विशेषत: कामगार आणि शेतकऱ्यांच्या देण्यांबाबत अजूनही आकडा निश्चित झालेला नाही. कामगार संघटना आणि शेतकरी संघटनेचा दावा कारखाना प्रशासनाने अमान्य केला असून, नेमकी ही देणी कितीची आहेत, याबाबतची स्पष्ट माहिती सहकार विभागाकडेही नसल्याचे दिसते.