शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’च्या यात्रेत कोट्यवधीची उलाढाल

By admin | Updated: February 13, 2017 00:11 IST

लाखो भाविकांची गर्दी : अमाप उत्साहात काळभैरीचे दर्शन

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाची यात्रा अमाप उत्साहात पार पडली. लाखावर भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त कोट्यवधीची उलाढाल झाली. सीमाभागासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते.‘काळभैरीऽऽ...बाळभैरीऽऽ..’चा गजर करत मध्यरात्रीपासूनच बसगाड्या, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाडीने भाविक दर्शनासाठी डोंगरावर जात होते. मध्यरात्री प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.‘श्रीं’च्या दर्शनासाठी डोंगरावरील मंदिराच्या परिसरात मंडप व बॅरकेटस् बांधण्यात आले होते. दर्शनासाठी जाण्या-येण्याचा मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आला होता. डोंगरावर दर्शनासाठी क्लोज सर्कीट टीव्हीची व्यवस्था केली होती. डोंगराच्या पायथ्याशी खेळणी, खाद्यपदार्थ, शीतपेये, तयार कपडे, मेवा-मिठाई, नारळ, कापूर-साखर विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते. डोंगरावर केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे मोफत वैद्यकीय सेवा, गडहिंंग्लज तालुका टु-व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनतर्फे मोफत यंदाही बे्रक डाऊन सर्व्हीस पुरविण्यात आली. गडहिंग्लज आगारातर्फे जादा बसफेऱ्यांची सोय करण्यात आली होती. अनिरूद्धबापू फौंडेशन व गडहिंंग्लज अर्बन बँक कर्मचाऱ्यांनी सेवाकार्यात विशेष भूमिका बजावली. कचरा संकलनासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे डोंगरावर ठिकठिकाणी बॉक्स ठेवले होते. भाविकांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वागताचे फलक लावून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा यशस्वीतेसाठी डी.वाय.एस.पी. रमेश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र मांडेकर, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, उपसरपंच वैभव साबळे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, बांधकाम उपअभियंता देसाई व मांगलेकर, पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यासह जीर्णोद्धार समिती, पंचमंडळी, मानकरी आणि बड्याचीवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)तृप्ती देसाई यांनी घेतले दर्शनभू-माता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. जीर्णोद्धार समिती अध्यक्ष निरंजन कित्तूरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.