शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

...ही तर दलालांनी केलेली टीका

By admin | Updated: October 21, 2015 00:45 IST

हसन मुश्रीफ यांचा पलटवार : महादेवराव महाडिक यांनी स्पष्टीकरण द्यावे

कोल्हापूर : महाडिक घराण्याचा दहा पिढ्यांचा परवापर्यंत उद्धार करणारे परंतु आता लाचाराप्रमाणे त्यांच्या वळचणीला गेलेले माजी महापौर सुनील कदम यांनी माझ्यावर केलेल्या टीकेस आमदार महादेवराव महाडिक यांची संमती आहे का, याचा खुलासा आमदार महादेराव महाडिक यांनी तातडीने करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. माझ्यावरील टीका ही महाडिक यांच्या पाठिंब्याशिवाय खालच्या खाली दलालांनी केलेली असावी, असाही पलटवार मुश्रीफ यांनी केला.रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रारंभ मेळाव्यात मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यास सोमवारी ताराराणी आघाडीतर्फे सुनील कदम यांनी प्रत्त्युतर दिले व त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. ही टीका कदम यांनी महाडिक यांना बरे वाटावे म्हणून केली आहे की त्या टीकेस आमदार महाडिक यांची संमती आहे हे स्पष्ट होण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.पत्रकात म्हटले आहे, ‘माझी टीका ही व्यक्तिगत नव्हती. कोल्हापूर शहरात घराघरांत होणारी चर्चाच मी जाहीरपणे बोलून दाखविली. कारण एकाच कुटुंबातील ( तिघे वेगवेगळ््या पक्षांमध्ये असून त्या-त्या पक्षाची त्यांच्यामुळे होणारी कुचंबणा चव्हाट्यावर आणण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामध्ये व्यक्तिगत टीका अगर ‘असंसदीय शब्द’ नव्हता. त्या टीकेमध्ये एवढे अस्वस्थ होण्यासारखे काही नसताना त्याचा खुलासा करुन सुध्दा व्यक्तिगत टीका ही माझ्या संतापात भर घालणारी आहे. त्यामुळे या टीकेला आमदार महादेवराव महाडिक कुटुंबीयांचा पाठिंबा असेल असे मला वाटत नाही असे आमदार मुश्रीफ म्हणाले. (प्रतिनिधी)