शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विमानतळ विकास श्रेयवादावरून टीका; शासकीय शिष्टाचार पाळला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:24 IST

एकच खासदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा भूमिपूजन समारंभ घाईगडबडीत उरकून घेतल्याची टीका खासदार संभाजीराजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता गुरुवारी केली.

ठळक मुद्देभूमिपूजनास फक्त महाडिक कुटुंबीयच कसे?संभाजीराजे यांची विचारणा मंत्र्यांच्या कार्यालयात बोलावून तोडगा काढण्याची विनंती केली. तेव्हा मला एकट्यालाच श्रेय घेता आले असते; परंतु

कोल्हापूर : एकच खासदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा भूमिपूजन समारंभ घाईगडबडीत उरकून घेतल्याची टीका खासदार संभाजीराजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता गुरुवारी केली. या कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी राज शिष्टाचाराचेही पालन करण्याचे औचित्य दाखविले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रखडलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे ९३० मीटर विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी झाले. सुमारे ८० कोटींचे हे काम आहे. खासदार महाडिक, आमदार अमल महाडिक व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्रक संभाजीराजे यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले. त्यात ते म्हणतात, ‘विमानतळ विस्तारीकरण करणे आणि नियमित विमानसेवेसाठी पालकमंत्री चंद्रकात पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्यासह माझेही प्रयत्न महत्त्वाचे असताना कोणतीही कल्पना न देता विस्तारीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम घाईगडबडीत उरकण्यात आला.

शासकीय राजशिष्टाचारानुसार महत्त्वाच्या योजनेचा प्रारंभ करताना जिल्ह्यातील खासदार, आमदार व संबंधित मंत्री, पालकमंत्री यांना निमंत्रण देणे आवश्यक असते. खासदार म्हणून मी विमानसेवा, विमानतळ विस्तारीकरणासाठी केलेले प्रयत्न जिल्ह्याला माहीत आहेत. यापूर्वी लोकप्रतिनिधी, अनेक संस्था, उद्योजकांनी विमानतळासाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्याबरोबरच विमानतळ विस्तारीकरण करण्यात येत आहे; परंतु यामधील कोणालाही पूर्वकल्पना न देता विमानतळ विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन शासनाचे अधिकारी कसे काय घेऊ शकतात? ते शासनाचे अधिकारी आहेत, की एकाच खासदारांचे हे त्यांनी स्पष्ट करावे.

मी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांना सर्वप्रथम भेटलो, तेव्हा कोल्हापूर विमानतळाच्या स्थितीबाबत चर्चा केली. मला खासदार बनून एक महिनाही उलटला नव्हता. महिन्याभरात दुसºयांदा भेट घेऊन (२९ आॅगस्ट २०१६) विमानतळाच्या अडचणीचे विस्तृत पत्र त्यांना दिले. त्यानुसार पुढे बैठका आणि परवानग्या मिळायला सुरुवात झाली. मी महाराष्ट्रातील संबंधित मंत्री, संबंधित सर्व खासदार आणि अधिकारी यांना मंत्र्यांच्या कार्यालयात बोलावून तोडगा काढण्याची विनंती केली. तेव्हा मला एकट्यालाच श्रेय घेता आले असते; परंतु मी श्रेयवादाचे राजकारण केले नाही. उलट जिल्ह्यातील सर्व खासदारांना बोलवा, असा आग्रह मी धरला होता.ही तर शोकांतिकाच..एखाद्या कामाचे श्रेय एकट्यालाच मिळावे, यासाठी शासकीय अधिकाºयांना हाताशी धरून अशा प्रकारचे भूमिपूजन करणे म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातील शोकांतिका म्हणावी लागेल, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.मला प्रसिद्धीची कला अवगत नाही..

आम्हाला फक्त श्रेय घ्यायची किंवा प्रसिद्धीची कला अवगत नाही म्हणा, अथवा त्याची आवश्यकताही नाही, अशी आमची भावना आहे. मला याचे वाईट वाटते की, राजर्षी शाहूंच्या कार्यकर्तृत्वाने ओळखल्या जाणाºया या विकासनगरीला दिवसेंदिवस खालावत चाललेल्या स्थानिक राजकारणाचा फटका बसू नये, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती