शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: December 31, 2014 00:09 IST

शेकापची मागणी : तासगावमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, रॅली

कवठेएकंद : ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे अदा करणे बंधनकारक आहे; परंतु साखर कारखानदारांनी याबाबत टाळाटाळ केली जाते. एफआरपीप्रमाणे ऊसदर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच उसाचा अंतिम दर ३५०० रुपये प्रतिटन मिळावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली. ऊसदरप्रश्नी आज (मंगळवार) तासगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व शंकरराव माळी, संपतराव पवार, सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, शंकरराव थोरबोले, जिल्हा चिटणीस शरद पाटील आदींनी केले. सिध्देश्वर मंदिर चौकातून तहसील कार्यालयावर दुचाकीवरुन घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा काढला.उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल ऊस गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळावी, शेती पंपांच्या विजेची दरवाढ रद्द करावी, शेतीमालावरील अडत रद्द करावी, शेतकऱ्यांना मासिक २000 रु. पेन्शन मिळावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच उसाला अंतिम दर ३५00 रुपये प्रतिटन मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. शेतीमालाला दर मिळत नाही, वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.प्रा. बाबूराव लगारे म्हणाले की, कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऊस गेल्यापासून १४ दिवसांत साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. कायद्याप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी शंकरराव माळी, संपतराव पवार, सूर्यकांत पाटील, शरद पाटील, शंकरराव थोरबोले, वसंतराव तपासे, अशोक घाईल, डॉ. नरेंद्र खाडे, दीपक जाधव यांची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शेखर दळवी यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवू, अशा आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. (वार्ताहर)बिलाची मागणीगतवर्षीच्या ऊस हंगामातील फक्त एकच हप्ता ८०० रु. ने दर देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अशा कारखान्यांबाबत शासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शेकापने पुकारलेल्या धडक मोर्चावेळी शेकापसह राष्ट्रवादी, भाजप, महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.