शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: July 11, 2017 00:47 IST

खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिंगणापूर, पाडळी खुर्द, बालिंगा, हसूर दुमाला, म्हालसवडे येथे बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश खरमाटेंसह ग्रामसेवक व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच मृत मतदारांची नावे यादीतून काढावीत, अशी मागणी सोमवारी आमदार चंद्रदीप नरके यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यात सध्या नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये करवीर मतदारसंघातील काही गावांमध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बालिंगा येथे ५८० बोगस मतदार आढळून आले. या मतदारांकडे स्थानिक ग्रामस्थांनी योग्य कागदपत्रांसाठी तगादा लावल्यावर काहीजणांनी मतदान न करता पळ काढला होता. या बोगस मतदारांच्या नावांची यादी निवडणूक विभागाकडे देऊनही आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. येथील ग्रामसेवकांनी बोगस दाखला व बोगस ओळखपत्रे देऊन नोंदणी करण्यास हातभार लावला होता, असे नरके म्हणाले.म्हालसवडेतील काही मतदारांची नावे ही हसूर दुमालाच्या मतदारयादीत नोंद करण्यात आली आहेत, तर हसूरमधील नावे ही म्हालसवडे गावात नोंद केली आहेत. याबाबत संबंधित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली. असे असूनही त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. खरमाटे यांच्यासह संबंधित ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून खऱ्या सूत्रधाराला समोर आणा, अशी मागणी नरके यांनी केली. यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रवींद्र खाडे, दादासो लाड, किशोर पाटील, संजय पाटील, विलास पाटील, आनंदा पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, आदी उपस्थित होते.शिंगणापूरमध्ये डाटा आॅपरेटर्सचा प्रताप शिंगणापूर गावात तेथील मतदार नोंदणीसाठी नेमलेल्या डाटा आॅपरेटर्सनीच मनमानी पद्धतीने बोगस नावे घुसडली. नक्कीच याच्यामागे कोणी तरी आहे? याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी आ. नरके यांनी केली.चावडी वाचन करून नावे कमी कराबोगस झालेली मतदार नोंदणीतील नावे जिल्हा प्रशासनाने चावडी वाचन करून कमी करावीत, असे आमदार नरके यांनी सांगितले.