शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

परजिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:50 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खून, लूटमार, चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल असणाºया पुणे, सातारा, सांगली, कर्नाटकातील गुन्हेगारांच्या टोळ्या काही दिवसांपासून कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा जबरी लूटमारीच्या घटना घडू लागल्याने शहर असुरक्षित बनले आहे.शहरात महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना आता चोरांनी वृद्धांना लक्ष्य ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खून, लूटमार, चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल असणाºया पुणे, सातारा, सांगली, कर्नाटकातील गुन्हेगारांच्या टोळ्या काही दिवसांपासून कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा जबरी लूटमारीच्या घटना घडू लागल्याने शहर असुरक्षित बनले आहे.शहरात महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना आता चोरांनी वृद्धांना लक्ष्य केले आहे. मोटारसायकलीवरून भरधाव वेगाने येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याची नवीन पद्धत कोल्हापुरात सुरू केली आहे. गुन्ह्यांची पद्धत मुंबई-पुण्यातील गुन्ह्यांसारखी असून तेथील बहुतांश गुन्हेगार कोल्हापुरात आले आहेत. पुणे, सांगली, सातारा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळक्यांना ‘सळो की पळो’ करून सोडल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांना चकवा देत या टोळ्या कोल्हापुरात वास्तव्यास आल्याची गोपनीय माहिती पोलिसांकडे आली आहे. स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून या टोळ्यांनी जवाहरनगर, राजेंद्रनगर, वारे वसाहत, सदर बझार, शाहूनगर, दौलतनगर, टाकाळा, आदी परिसरात वास्तव्य केले आहे. काही गुन्हेगारांचा हॉटेल-लॉजवर मुक्काम आहे. पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी सुरू असल्याने सर्व पोलीस अपुरी कामे पूर्ण करण्याच्या धांदलीत आहेत. त्यामुळे पेट्रोलिंग, रात्रगस्तीचे प्रमाण कमी झाल्याने लूटमारीच्या घटना वाढल्याची चर्चा नागरिकांत आहे.तोतया पोलीस सापडेनातरुईकर कॉलनी येथे शिवाजी महादेव लायकर (वय ६४, रा. एल.आय.सी. कॉलनी, रुईकर कॉलनी परिसर) यांचे साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दानिगे, आपटेनगर येथे शिवाजी दत्तात्रय साठे (६७, रा. राधेयनगरी, आपटेनगर) यांची सोन्याची चेन पोलीस असल्याची बतावणी करून लंपास केली. अमित कांबळे या भामट्याने पोलीस असल्याची बतावणी करून शाहूपुरीतील हॉटेलमालकाला सतरा हजाराला गंडा घातला. हे तोतया पोलीस मोकाट असून ते अद्यापही सापडलेले नाहीत.दोन महिन्यांत ५० दुचाकींची चोरीघरासमोर, बसस्थानक, महाद्वार रोड यांसह दुकानच्या दारात पार्किंग केलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. बनावट चावीचा वापर करून दिवसाढवळ्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यांत ५० दुचाकी चोरीची नोंद पोलीस दप्तरी आहे. चोरीनंतर या दुचाकी कमी किमतीत विना कागदपत्रांद्वारे विक्री केली जाते. तसेच जुन्या दुचाकी स्क्रॅप करून त्यांचा नंबर लावून त्या वापरल्या जातात. काही दुचाकींचे स्पेअरपार्ट काढून ते विक्री केले जातात.नियमबाह्य वाहनधारकांवर आजपासून कारवाई होणारवाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत आज, सोमवारपासून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करणार आहे. पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे हे स्वत: रस्त्यावर उतरून अशा वाहनचालकांना दणका देणार आहेत. चौका-चौकांत प्रत्येक दुचाकी, चारचाकी तपासली जाणार आहेत. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट,‘दादा’,‘मामा’, अशा फॅशनेबल नंबरप्लेट लावणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.