शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

‘रिलायन्स’च्या व्यवस्थापकावर गुन्हा

By admin | Updated: November 8, 2015 23:35 IST

या कंपनीमार्फत विजयदुर्ग गगनबावडा कोल्हापूर मार्गाच्या बाजूने फोर जी केबल टाकण्यात येत आहे.

वैभववाडी : रिलायन्सची फोर जी केबल टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता व साईडपट्टी खोदून अतिक्रमण व नुकसान केल्याच्या आरोपावरून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे व्यवस्थापक आप्पासाहेब बापूसाहेब भोसले यांच्याविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शैलेश मोरजकर यांनी गुरुवारी रात्री तक्रार दिली होती. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (मेहकर चेंबर, नरिमन पॉईंट) या कंपनीमार्फत विजयदुर्ग गगनबावडा कोल्हापूर मार्गाच्या बाजूने फोर जी केबल टाकण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची आगाऊ परवानगी कंपनीने घेतली आहे. परंतु, वैभववाडीपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर करूळ येथे जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. तसेच रस्त्यालगत साईडपट्टी खोदून सार्वजनिक बांधकाम विभागाचे नुकसान व अतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना न देता केबल टाकण्यासाठी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्थींचे उल्लंघन करून अतिक्रमण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शैलेश मोरजकर यांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार भादंवि कलम ४३१, ४४२, ४२७ अन्वये कंपनीचे व्यवस्थापक आप्पासाहेब भोसले यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवा शिवगण करीत आहेत. (प्रतिनिधी) बांधकामला आली जागमे २0१५ पासून तळेरे ते गगनबावडा दरम्यान रिलायन्सची केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य महामार्गालगत खोदलेल्या चरात नाधवडे येथे जनावरे तसेच ठिकठिकाणी वाहने रुतल्याने नुकसान झाले. मात्र, संबंधितांनी वेळोवेळी तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नव्हते. परंतु रस्ता खोदल्यानंतर आता बांधकामला तब्बल सहा महिन्यानंतर जाग आली आहे.