नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अलबादेवी गावाजवळ असलेल्या गावडे यांच्या काजू बागेत बैलगाडी शर्यत आयोजित केल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक ए. बी. तळेकर यांनी घटनास्थळी फौजफाट्यासह येऊन विनापरवाना बैलगाडीसाठी शर्यत आयोजक धोंडीबा दत्तू घोळसे (रा. अलबादेवी ता. चंदगड),खादर भडगावकर (रा. आजरा) पिंटृ तरवाळ (रा. तुर्केवाडी), संतू रेडेकर (रा. मुगळी), राहुल नाईक (रा. हेब्बाळ), रामलिंग गुरव (रा. कागणी), मारुती पाटील, मारुती कबाडे (दोघे रा. मलगेवाडी), रामू भोईगोंडे (रा. तेऊरवाडी), जग्गू कसळकर, पुंडलिक आंबेवाडकर, महादेव मल्हारी, सुधीर नागरदळेकर, सौदागर सुतार, प्रभाकर पाटील (सर्व रा. कुदनूर, ता.चंदगड), गंगाराम पाटील, सुधीर पाटील (दोघे रा.सांबरे ता. गडहिंग्लज), ईश्वर गुडुळकर (रा.कुमरी, ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर), पंकज अर्दाळकर (रा. अडकूर ), बाळू प्रधान (रा. जक्कनहटटी) यांच्यासह अन्य पाचजणांवर गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे,
अलबादेवी येथे विनापरवाना बैलगाडी शर्यत, आयोजक, बैलजोडी मालकावर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST