शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST

कोल्हापूर : येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मोबाईलवरून मटका घेणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाने ताब्यात घेतले. विराजकुमार सोनवले ...

कोल्हापूर : येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मोबाईलवरून मटका घेणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाने ताब्यात घेतले. विराजकुमार सोनवले (३१, रा. विक्रमनगर) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून रोकडसह मोबाईल असा १० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मालकासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे विराज सोनवलेसह मालक किरण पाटील (रा. उचगाव), सुजित साठे, प्रदीप गुरव, महेश निपाणीकर अशी आहेत.

राजारामपुरी तिसऱ्या गल्लीत मोबाईलवरून एकजण मटका घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितास ताब्यात घेतले. त्याने स्वत:चे नाव विराज सोनवले असून मटका मालक किरण पाटील असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवार पेठ परिसरातील रंग विक्रेत्‍यावर गुन्‍हा

कोल्हापूर : एका रंगांच्‍या कंपनीच्‍या परवानगीशिवाय त्‍या कंपनीच्‍या नावे रंग विक्री करून कॉपीराईट नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या मंगळवार पेठ परिसरातील एका विक्रेत्‍यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला. वैभव विनायक भाेसले (रा. शांतीनगर, पाचगाव) असे त्‍याचे नाव आहे. मंगळवार पेठेतील नंगीवली चौक परिसरातील श्री सेल्‍स एजन्‍सीज दुकानात कंपनीच्‍या पथकाने छापा टाकला. त्यात बनावट पेंटचा डबा जप्‍त केला. त्याची तपासणी केल्‍यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी नीलेशकुमार रामशीश महंतो (रा. दिल्‍ली) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.