शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या प्रशांत हारगेवर मिरजेतही गुन्हे

By admin | Updated: January 7, 2015 00:54 IST

मिरजेत पकडल्याने बनावट दाखल्यांसाठी निवडले कोल्हापूर कार्यक्षेत्र

मिरज : कोल्हापुरात बनावट जात वैधता प्रमाणपत्रप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत हारगे याने मिरजेतही अशीच फसवणूक केली आहे. सेतू कार्यालयात दाखले मिळवून देणारा एजंट म्हणून काम करणाऱ्या हारगेवर मिरजेत जातीच्या दाखल्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. मिरजेत पकडला गेल्याने त्याने कोल्हापूर कार्यक्षेत्र निवडून बनावट दाखल्यांचा उद्योग सुरू केल्याचे पोलिसांच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रशांत हारगे याने पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मिरजेत सेतू कार्यालयात दाखले मिळवून देणारा एजंट म्हणून काम सुरू केले. गरजूंना जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी चांगले पैसे मिळत असल्याने सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हारगे याचा जातीचे दाखले मिळवून देण्याचा उद्योग सुरू होता. कागदपत्रे अपूर्ण असल्यास जातीचा दाखल मिळत नसल्याने दाखल्यासाठी बनावट कागदपत्रे, बनावट पुरावे तयार करून देत होता. मिरजेत जातीच्या दाखल्यासाठी एका प्रकरणात बनावट सात-बारा हजर केल्याने त्याच्यावर पाच वर्षांपूर्वी मिरज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटका झाल्यानंतर हारगेने कार्यक्षेत्र बदलले व कोल्हापूर जात पडताळणी कार्यालयात एजंट म्हणून काम सुरू केले. जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास असलेल्या हारगेने मल्लेवाडीतील समीर जमादार याच्या मदतीने स्कॅनर व प्रिंटरचा वापर करून बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यास सुरूवात केली. जात पडताळणी कार्यालयातील काही कर्मचारी बनावट प्रमाणपत्रांसाठी त्याला ग्राहक मिळवून देत होते. त्यांच्याशी संगनमताने त्याने अनेकांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)पोलीस कारवाईनंतर नव्या ठिकाणी उद्योगत्याच्या दस्तगीर नावाच्या अन्य एका साथीदाराने मिरज परिसरात अनेकांना बनावट जातीचे दाखले दिल्याची माहिती मिळाली. तसेच त्याने एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली होती. या प्रकरणातही पोलीस कोठडीत जाऊन आल्यानंतर त्याचा बनावट प्रमाणपत्रांचा व्यवसाय सुरूच आहे. पोलीस कारवाई झाली की, पुन्हा नव्या ठिकाणी बनावट दाखले देण्याचा उद्योग सुरू करण्याची त्याची पध्दत आहे.