लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत लाऊड स्पिकरवर वाद्य लावून मिरवणूक परवाना शर्तीचा भंग केल्याप्रकरणी शहरातील विविध अकरा मंडळांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हे नोंद झाले.यामध्ये पी.एम. बॉईज (लक्षतीर्थ वसाहत), शांतीदूत कला क्रीडा मंडळ, यु.के.बॉईज (रंकाळा टॉवर), ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, आयडीयल स्पोर्टस् क्लब, धर्मराज तरूण मंडळ, बी.जी.एम. (सुभाषनगर), जयविजय मित्र मंडळ (कळंबा), पंत तालीम मंडळ, रेणुकादेवी मित्र मंडळ प्रणित पॉयझन ग्रुप, भगवा ग्रुप (सुतार मळा) या अकरा मंडळांचा समावेश आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ करीत आहेत.
अकरा गणेश मंडळांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:51 IST