कोल्हापूर : धावती दुचाकी अचानक पंक्चर झाल्याने रस्त्यावर पडून दाम्पत्य जखमी झाले. ही घटना शिये पुुलानजीक बुधवारी (दि. ९) रात्री घडली. शरद पांडुरंग कुंडले (वय ६५, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. ते पत्नीसह इस्लामपूरहून कोल्हापूरला येत असताना हा अपघात घडला. त्या्ंच्यावर सीपीआर रुग़्णालयात उपचार सुरू आहेत.
स्टँडवरून दुचाकी चोरी
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने बनावट चावीचा वापर करून अथवा लॉक तोडून चोरून नेली. याबाबत तुकाराम शंकर मंगल (वय ५३, रा. नाळे कॉलनी रोड, एस. के. गार्डनशेजारी, कोल्हापूर ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
कोल्हापूर : महामार्गावर मयूर पेट्रोल पंपानजीक भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने वसंत गुंडा पाटील (वय ६८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) हे दुचाकीस्वार जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी (दि. ९) रात्री घडली. त्यांच्यावर सीपीआर रुग़्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन दुचाकींची धडक
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरनजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे युवक जखमी झाले. बाबूराव रामचंद्र वर्तक (वय १९, रा. कदमवाडी), अझरुद्दीन कासीम मुल्लाणी (३२ रा. कुशिरे, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता हा अपघात घडला. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(तानाजी)