शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

प्रवेशद्वारात ‘ठेचांनी’ स्वागत; कोल्हापूरला जोडणारे रस्ते दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:01 IST

तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहर वेगाने विकासाकडे झेप घेत आहे. मात्र, या वेगात तावडे ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहर वेगाने विकासाकडे झेप घेत आहे. मात्र, या वेगात तावडे हॉटेलसह शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांची वाढती अतिक्रमणे, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे शहराचे प्रवेशद्वारच खुजे बनले आहे. ६0 वर्षांपूर्वीच्या कोल्हापूर शहराच्या ६६.८२ कि.मी. क्षेत्रफळात किंचीतही वाढ न झाल्याने चारही बाजूंनी शहराची प्रचंड कोंडी होत आहे. वाहनधारकांना ठेचकाळत शहरात प्रवेश करावा लागतो.पाच वर्षांपूर्वी ‘आयआरबी’च्या कृपेने शहरात प्रवेशणारे रस्ते काँक्रिटीकरणाने सुसज्ज बनविले. मात्र, वाहतुकीने व लोकवस्तीने गच्च भरलेल्या कोल्हापूर शहराला देखणे प्रवेशद्वार मिळाले नाही हे दुर्दैवच. राष्टÑीय महामार्गाकडे तोंड करून मुख्य स्वागत कमान आहे. देखणे प्रवेशद्वार असावे, यासाठी ‘बास्केट ब्रिज’ मंजूर झाला, पण गेल्या तीन वर्षांत ही वल्गनाच ठरत आहे. पंचगंगा पूल ओलांडला की उजव्या बाजूच्या बोळकांडातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. शहराला जोडणाºया उर्वरित प्रमुख सात मार्ग आणि तीन उपमार्ग यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. अंबाबाई दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक तसेच शहराशी संपर्कात असलेले ग्रामीण भागातील लोकांची वाहने, मालवाहतूक गाड्या, केएमटी, रिक्षा, यांसह इतर प्रवासी वाहतूक करणाºया गाड्यांची मोठी गर्दी या रस्त्यावर असते. रोज हजारो वाहनांची ये-जा शहरात होते. मात्र, खड्डे व वाहतूक कोंडीने मनस्तापच सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात प्रवेशणारे दुपदरी रस्ते प्रशस्त हवेत.राष्टÑीय महामार्गावरून तावडे हॉटेलमार्गे शहरात येताना शिरोली नाक्यावरील स्वागत कमान ही कोल्हापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाते. त्यानंतर रत्नागिरी ते कोल्हापूर या राज्य महामार्गासह गगनबावडा ते कोल्हापूर, गारगोटी ते कोल्हापूर, राधानगरी ते कोल्हापूर हे तीन प्रमुख राज्य महामार्ग तसेच शाहू टोलनाका, शिये (बावडा मार्गे), मुडशिंगी-उचगाव, सरनोबतवाडी, आर. के. नगर हे उपमार्ग म्हणून संबोधले जातात.कालबाह्य शिवाजी पुलावर वाहतूक कोंडी; तुटलेला आयलँड स्वागतालारत्नागिरी ते कोल्हापूर हा सध्या राष्टÑीय महामार्ग असला, तरी तो कोकणला जवळीक आणणारा आहे. जिल्ह्याच्या हद्दीतील ६३ कि.मी. लांबीचा हा मार्ग आहे. सध्या सात मीटर रुंदीचा दुपदरी रस्ता असला, तरीही हा रस्ता चौपदरी मंजूर झाला आहे. तो आता एकूण १४ मीटर रुंदीकरण होणार आहे. कालबाह्य झालेला अतिशय अरुंद शिवाजी पूल हा कोल्हापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा मान दिमाखात बजावतोय; पण सध्या शिवाजी पूल हा विषय वादातीत बनला आहे. याला शेजारीच पर्यायी पूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण हा पर्यायी पूल पूर्ण झाल्यानंतरही त्यावरून येणारी वाहतूक ही शहरावर ताण पडणारी आहे. पन्हाळा ते कोल्हापूर मार्गावरील आसपासच्या सुमारे २५ हून अधिक गावांतील बहुतांश नागरिकांचा चरितार्थ हा कोल्हापूर शहरावर अवलंबून असल्याने त्यांचा शहरात रोजचा राबता वाढतच आहे; त्यामुळे सकाळी अन् सायंकाळी, तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा देवदर्शनासाठी ये-जा करणाºया भाविक व पर्यटकांचा भार या शिवाजी पुलावरून पुढे शहराची कोंडी वाढविणारा ठरत आहे.राष्टÑीय महामार्ग कोल्हापुरातूनच!रत्नागिरीहून येणारी सर्व वाहतूक ही कोल्हापूरच्या दिशेने येताना किमानपन्हाळा, शिवाजी पुलावरून कोल्हापूर शहर ते तावडे हॉटेलपर्यंत (राष्टÑीय महामार्गापर्यंत) जातात. हा मार्ग अत्यंत अरुंद असल्याने त्याचे चौपदरीकरण केल्यास या वाहनांचा अतिरिक्त भार कोल्हापूर शहरावर पडणार नाही. शहरातील या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण होणे गरजेचे आहे.मुख्य प्रवेशद्वारातच ‘बास्केट ब्रिज’ लटकलापुणे ते बंगलोर राष्टÑीय महामार्गावरून कोल्हापुरात येण्यासाठी शहराच्या तावडे हॉटेलनजीक कलेचा नमुना असणारे मुख्य प्रवेशद्वार भव्य-दिव्य व्हावे, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘बास्केट ब्रिज’ची खासदार धनंजय महाडिक यांनी गुपचूप मंजुरी मिळवली; पण फक्त मंजुरीच झाली, पुढे ‘निविदा पे निविदा’ अशा गर्तेत हा बास्केट ब्रिज लटकलाच. महामार्गावरून पंचगंगा नदीच्या पैलतीरापासून शिरोली नाक्यापर्यंत असा सुमारे १२६० मीटर लांबीचा वक्र होऊन, शहरात प्रवेशणारा अशी ‘बास्केट ब्रिज’ची कल्पना. सुमारे १७५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव खासदार महाडिक यांनी २०१६ ला राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे ठेवला. त्याला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली; पण याच ‘ब्रिज’ निर्मितीची प्रतीक्षा काही संपेना. वारणा ते कागल या दरम्यानच्या राष्टÑीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या ८५० कोटी रुपये खर्चाच्या कामात या ‘ब्रिज’चा समावेश केला; त्यामुळे ‘बास्केट ब्रिज’ची निविदा काढली; त्यासाठी दि.४ नोव्हेंबर २०१८ अंतिम मुदत होती, तर दि. ४ डिसेंबर रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. पंचगंगा पुलापेक्षा २० फूट उंचीवरून या ‘बास्केट ब्रिज’ची निर्मिती होणार आहे. त्यानंतरच कामाला गती येणार आहे; पण हा ‘बास्केट ब्रिज’ करण्यासाठी सध्याची भव्य असणारी स्वागत कमान मात्र हटवावी लागणार आहे. असो, पण सध्यातरी हा ब्रिज ‘बास्केट’प्रमाणे लटकलेला आहे.टोलचे भूत अद्याप मानगुटीवरकोल्हापूर शहरातील रस्ते ‘बीओटी’ तत्त्वावर सुशोभीकरण करण्यासाठी ‘आयआरबी’ कंपनीने घेतले. त्यांनी या रस्त्यांची कामे २०११ पर्यंत पूर्ण केली; पण त्यानंतर त्या रस्त्यासाठी टोल आकारताना नागरिकांनी विरोध केल्याने दोन वर्षे आंदोलने सुरू राहिली. अखेर भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २०१५ ला टोल रद्द केला; पण अद्याप हा प्रश्न मिटला नसून, शासन आणि आयआरबी कंपनी यांच्यात किती रक्कम द्यायची? याबाबत वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे; त्यामुळे टोल तात्पुरता रद्द झाल्याची भावना झाली असली तरीही टोलचे भूत अद्याप कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर कायम आहे.नवा रिंगरोड शहरावरीलवाहतुकीचा ताण कमी करेलगेल्या २५ वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या भोवतीने उपनगरातून महापालिकेने तयार केलेला फुलेवाडी ते सायबर चौकपर्यंतचा रिंगरोड कालबाह्य झाला आहे, तो आता शहरातच गणला जातो; त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवा रिंगरोड आकारास येत आहे.राष्टÑीय महामार्ग क्र. ४ जाजल पेट्रोल पंपपासून कणेरी, गिरगावमार्गे नवा रिंगरोड आकारास येत आहे. हा मार्ग नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडित्रे फॅक्टरी, वाकरे, खुपीरे, यवलूज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, मौजे वडगाव, हेर्ले, रुकडी फाटा, रुकडी, चिंचवाड, वसगे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते पुन्हा जाजल पेट्रोल पंप असा हा नवा रिंगरोड मंजूर झाला आहे. या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादनासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च येणार आहे.शाहू नाका : अरुंद एंट्री; किचकट एक्झिटराष्टÑीय महामार्गावरून बंगलोरच्या दिशेने येणारी वाहतूकशाहू नाकामार्गे कोल्हापूर शहरात येते. येथे महामार्गावरून शहरात प्रवेश करताना अरुंद रस्ता आहे. शिवाय येथे समोरच बसस्टॉप आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यातून प्रवेश करावा लागतो. मात्र, पुढे समाधानकारक आयलँड असून, रस्ता चौपदरी आहे. पण याच मार्गावरून बाहेर जाताना ब्रिजवरून खाली उतरून महामार्गावर वाहने उतरताना मागून येणाºया वाहनाकडे दुर्लक्ष झाल्यास माठी दुर्घटना घडून जिवावर बेतण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे हा पूल महामार्गाच्या पलीकडे डाव्या बाजूने वाहने उतरतीला असणेआवश्यक होते. या चुकीच्या पद्धतीच्या ब्रिजवरून जाताना अनेकांच्या जिवावर बेतले आहे.कसबा बावडामार्ग धोकादायकराष्टÑीय महामार्गावरून शिये, कसबा बावडामार्गे कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी व त्याच मार्गाने बाहेर जाण्यासाठी अनेक वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. महामार्गावरून शिये येथून भव्य अशा ब्रिजखालून शहराकडे येणारा रस्ता ‘आयआरबी’ने सुसज्ज केला आहे. पंचगंगा नदीची हद्द ओलांडल्यानंतर चौपदरीकरणाने शहरात प्रवेश करणारा हा रस्ता आहे. कसबा बावड्यात रस्ता निमुळता होत, नागरी वस्तीतून जाताना अत्यंत धोकादायक बनला आहे. काहींच्या हट्टापोटी अरुंद केलेला हा रस्ता बावडेकरांनाच धोकादायक ठरू लागला आहे. या कसबा बावडा मार्गावर अत्यंत दाट नागरी वस्ती असल्याने तसेच राजाराम साखर कारखान्याची प्रचंड वाहतूक असल्याने या मार्गावर ये-जा करणारी वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते.फुलेवाडी प्रवेशद्वार खड्ड्यात(कोल्हापूर-गगनबावडा मार्ग)कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गानंतर कोकणला जोडणारा कोल्हापूर ते गगनबावडा हाही रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. शहरात येताना फुलेवाडी प्रवेशद्वारावर खड्ड्यांनी स्वागत होते. शहराला पाणीपुरवठा करणाºया गळक्या जलवाहिनीमुळे हा रस्ता नेहमीच उखडलेला, खड्डेमयच बनलेला असतो. फुलेवाडी नाक्यानजीक ‘वडाप’ वाहतुकीचे अड्डे असल्याने प्रवेशद्वारावर वाहनांची कोंडी ही नित्याचीच बाब आहे. करवीर, पन्हाळ्याचा काही भाग आणि