शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी अंधांकडून ‘आॅर्केस्ट्रा’ची निर्मिती

By admin | Updated: August 12, 2014 00:40 IST

अंधांसाठी वसतिगृह : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अंध युवक मंचचा उपक्रम

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे अंध युवक मंच, हणबरवाडी संचलित अंधांसाठीचे वसतिगृह चालविले जाते. विशेष म्हणजे अंधांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, याकरिता अंधांनी अंध युवक-युवतींसाठी हे वसतिगृह चालविले आहे. मात्र, या वसतिगृहास शासकीय अनुदान नसल्याने या युवक मंचने आॅर्केस्ट्रा व बेंजो पार्टीची निर्मिती केली आहे. हा वाद्यवृंद गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात सादर करून मदत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी माहिती अंध युवक मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे यांनी आज, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. २००७ साली अंध युवक मंचची स्थापना करण्यात आली. यामध्ये अंधांनी अंधांसाठी २५ जणांचे वसतिगृह क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे सुरू केले आहे. या वसतिगृहामध्ये २५ विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली आहे. हे विद्यार्थी विकास विद्या मंदिर, गोपाल कृष्ण गोखले कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी येणारा खर्च समाजातील दानशूर व्यक्तींकडून येणाऱ्या मदतीवरच केला जात आहे. त्यामुळे ही मदतही अपुरी पडू लागली आहे. संस्थेचे सदस्यच आपल्या घरच्यांकडून व प्रसंगी खिशातून खर्च भागवत आहेत. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात आपल्या अंध बांधवांकडे असणारी कला सादर करून त्यातून येणाऱ्या पैशांवर वसतिगृहाचा गाडा चालविण्याचा मानस या युवक मंचाकडून केला आहे. त्यादृष्टीने मंचाने नवरंग आॅर्केस्ट्रा व बेंजो पार्टीची निर्मिती केली आहे. ज्या मंडळांना गणेशोत्सव मिरवणुकीसाठी अंध युवक मंचला आमंत्रित करावयाचे आहे. त्यांनी मंचच्या संजय ढेंगे किंवा बशीर शेख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.