शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या भुंकण्यावरून खडकेवाडा येथे हाणामारी

By admin | Updated: April 10, 2016 01:16 IST

दहाजण जखमी : पाच गंभीर; घरावर दगडफेक; बंदुकीचा वापर करून दहशत माजविण्याचा प्रयत्न !

मुरगूड : कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे कुत्र्याच्या भुंकण्यावरून भोसले आणि कदम कुटुंबीयात जोरदार हाणामारी झाली. मारामारीत काठ्या, गज, चटणीचा वापर झाला. यात दहाजण जखमी झाले असून, यातील पाचजण गंभीर आहेत. यावेळी कदम कुटुंबीयांनी बंदुकीचा वापर करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यामध्ये नोंद घेण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खडकेवाडा पैकी कदमवाडी परिसरात अशोक गुंडू भोसले आपल्या कुटुंबीयांबरोबर राहतात. घर शेतवडीत असल्याने त्यांनी संरक्षणासाठी कुत्रा पाळला आहे. त्यांच्या दारावरून जयवंत पुंडलिक कदम हे आपल्या घराकडे ये-जा करीत असताना त्यांना कुत्रा भुंकतो, अंगावर धावून येतो या कारणास्तव चार दिवसांपूर्वी वाद झाला होता; पण गावचे पोलिसपाटील आप्पासाहेब पोवार यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला होता. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास अशोक भोसले यांचा नववीत शिकणारा मुलगा आकाश खेळण्यासाठी आपल्या मित्रांना बोलविण्यास गेला असता कदम कुटुंबीयांनी त्याला जोरदार मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना आकाशच्या घरी समजल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अशोक भोसले पोलिसपाटलांसह जयवंत कदम याला जाब विचारण्यास गेले. त्या ठिकाणी वादावादी होऊन दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार मारामारी झाली. यामध्ये आकाश अशोक भोसले (वय १६), सुजाता अशोक भोसले (३२, रा. खडकेवाडा) व दीपक मारुती चिंदगे (२९, रा. सौंदलगा) तसेच जयवंत कुंडलिक कदम, मुक्ताबाई कुंडलिक कदम हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय सुवर्णा जयवंत कदम, कुंडलिक अप्पा कदम, माधुरी शेंडुरे, गीता बळू भोसले व संगीता शिवाजी भोसले हे पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, जयवंत कदम यांनी हातामध्ये बंदूक घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भोसले कुटुंबीयांनी केला असून, आपल्या घरावर प्रचंड दगडफेक करून आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न भोसले कुटुंबाने केल्याचा आरोप जयवंत कदम यांनी पोलिसांसमोर केला आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून परस्परविरोधी तक्रारी देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक तपास सहा. पोलिस उपनिरिक्षक गणेश कवितके, युवराज राणे, आदी करीत आहेत.