शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सीपीआर’ची सुरक्षा राम भरोसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:10 IST

गृहविभागाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेमलेल्या सुरक्षारक्षकांनी गेले १५ दिवस काम बंद केल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची (सीपीआर) सुरक्षा राम भरोसे झाली आहे. सीपीआरचे प्रवेशद्वार म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ बनल्याने रुग्णालयाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देगृहविभागाने नेमलेल्या सुरक्षारक्षकांचे काम बंदसीपीआर प्रवेशद्वार म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ खासगी कंपनीकडून नेमलेल्या १९ सुरक्षारक्षकांवर जबाबदाºया

गणेश शिंदे

कोल्हापूर ,9 : गृहविभागाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेमलेल्या सुरक्षारक्षकांनी गेले १५ दिवस काम बंद केल्याने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची (सीपीआर) सुरक्षा राम भरोसे झाली आहे. सीपीआरचे प्रवेशद्वार म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ बनल्याने रुग्णालयाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.

राज्यात मुंबई, नाशिकसह शासकीय रुग्णालयात निवासी व आंतरवासीयता वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ले झाले, याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट्रातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या सुमारे दीड हजार सुरक्षारक्षकांची नेमणूक केली.

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘सीपीआर’साठी जादा ५६ सुरक्षारक्षकांची मागणी केली होती. त्यानुसार १ जुलै २०१७ पासून ‘सीपीआर’च्या सेवेत ५१ सुरक्षारक्षक आलेत. या सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकीसह अन्य सुरक्षेच्या सुविधाही देण्यात आल्या; पण आपणाला कामावर नियमित करावे या मागणीसाठी काम बंद ठेवले आहे.

एकंदरीत, राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही अशीच परिस्थिती असल्याचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘सीपीआर’मध्ये एकूण २१ विविध विभाग आहेत. त्यांपैकी अपघात विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती विभाग हे महत्त्वाचे विभाग आहेत. विशेषत: म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ होणारी गर्दीवर नियंत्रण राहावे याची या सुरक्षारक्षकांवर जबाबदार होती. रोज सकाळी आठ ते दुपारी चार, चार ते रात्री १२ व रात्री १२ ते सकाळी आठ अशा तीन शिफ्टमध्ये हे सुरक्षारक्षक कार्यरत होते.१९ सुरक्षारक्षक कार्यरत...सध्या या सुरक्षारक्षकांनी काम बंद केल्याने एका खासगी कंपनीकडून नेमलेल्या १९ सुरक्षारक्षकांवर जबाबदाºया आहेत. एकंदरीत, सीपीआरमधील नागरिकांचा राबता पाहता, या सुरक्षारक्षकांवर कमालीचा ताण येत आहे.दृष्टिक्षेपात...

  1. सीपीआरचे विभाग : २१
  2.  अतिमहत्त्वाचे विभाग : अपघात विभाग, अतिदक्षता विभाग.
  3. राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुरक्षारक्षकांनी ठेवले काम बंद.

सुरक्षारक्षकांच्या ‘काम बंद’बाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप शासनाकडून सुरक्षारक्षकांच्या पूर्ववत सेवेचा निर्णय झालेला नाही.- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर. :‘सीपीआर’मधील सुरक्षारक्षकांबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दोन दिवसांपूर्वी या प्रश्नी निवेदन दिले आहे. सुरक्षारक्षकांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी काम बंद ठेवले, हे समजू शकले नाही.- डॉ. रामप्रसाद राजेभोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्सी डॉक्टर ’(मार्ड).