शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीपीआर’मुळे वाचला कोडोलीच्या तरुणाचा जीव

By admin | Updated: May 12, 2017 01:17 IST

डॉक्टरांचे अथक प्रयत्न : मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर; अवघ्या चार-पाच दिवसांतच रुग्ण पूर्ण बरा

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : मधुमेह, रक्तदाब या आजारांनी कोम्यात गेलेल्या तरुण रुग्णावर उपचार करताना खासगी रुग्णालयातील डॉक्टरही हतबल झाले; पण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया (सीपीआर) मधील डॉक्टरांनी सलग चार दिवस उपचार करून त्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अवघ्या चार-पाच दिवसांच्या उपचारांनंतर गुरुवारी तो रुग्ण पूर्ण बरा होऊन ‘डिस्चार्ज’ घेऊन चालत घरी गेला. पुण्यातील खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा व मूळचा कोडोली (ता. पन्हाळा) येथील शिरीष शिवाजी चोपडे (वय ३०) असे या रुग्णाचे नाव होय. कोडोली येथे हौदात अंघोळ केल्यानंतर शिरीषला ताप आला, प्रकृतीही बिघडली. गावातीलच खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केले; पण धाप वाढली, शुद्धही हरपली. त्यामुळे त्याला दि. २५ एप्रिलला नातेवाइकांनी कोल्हापुरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तो पूर्णपणे कोम्यात होता. डॉक्टरांनी औषधोपचार केले, बिलही अवाढव्य केले; पण तो कोम्यातच राहिला. हतबल डॉक्टरांनी, ‘काही उपयोग होणार नाही’ हे नेहमीचे उत्तर देत घरी नेण्यास सांगितले. त्यामुळे शिरीष मृत्यूची अंतिम घटका मोजत असतानाच काहींनी कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी विश्वासाने शिरीषला चार दिवसांपूर्वी रात्री उशिरा उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले. शुद्ध हरपलेल्या अवस्थेतही तो कसाबसा श्वास घेत होता. त्याच्या रक्ताच्या चाचण्या घेतल्या. त्याला डेंग्यूसदृश रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आली. मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने शरीरात ‘किटो अ‍ॅसिड’ निर्माण झाले होते. दोन्हीही किडन्या निकामी होण्याच्या अवस्थेत होत्या. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटर लावले. कमी झालेल्या रक्तदाबाच्या परिस्थितीतही त्याच्यावर दोन वेळा डायलेसिस केले. तीन दिवस बेशुद्ध अवस्थेतील शिरीषचे सर्व अवयव बंद पडलेल्या स्थितीत होते. ‘सीपीआर’मधील डॉक्टरांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर तीन दिवसांनी शिरीषने औषधाला प्रतिसाद दिला. चौथ्या दिवशी तो चक्क उठून बसल्याने सर्वांच्या जिवात जीव आला. ‘सीपीआर’मधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शिरीषला चक्क मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते. गुरुवारी ठीकठाक झालेल्या शिरीषला रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ दिला. त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टराचे आभार मानले. अथक प्रयत्न करणारे डॉक्टरांचे पथकया रुग्णासाठी सीपीआरमधील डॉ. एम. व्ही. बनसोडे, डॉ. दर्शन, डॉ. स्नेहा, अतिदक्षता विभागातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, औषधतज्ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, विभागप्रमुख डॉ. आर. टी. बोरसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.