शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
4
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
5
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
6
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
7
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
8
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
9
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
11
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
12
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
13
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
15
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
16
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
17
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
18
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
19
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
20
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 

शिरोळ तहसीलवर माकपचा मोर्चा

By admin | Updated: March 9, 2015 23:53 IST

तहसीलदारांना निवेदन : सबसिडीऐवजी धान्य मिळावे, सरकारची धोरणे बदलण्याची मागणी

शिरोळ : रोख सबसिडी नको त्याऐवजी धान्य मिळावे, केंद्र व राज्य सरकारची आडमुठी धोरणे बदलावीत, यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरोळ तालुक्याच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्या शासनास कळविण्याचे आश्वासन तहसीलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. येथील शिवाजी चौकातून कोल्हापूरचे गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दीड वाजता मोर्चास सुरुवात झाली. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा!, रेशन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, यासह विविध घोषणा देत हा मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला. त्याठिकाणी कॉ. चंद्रकांत यादव यांनी, रोख सबसिडी नको, धान्य मिळाले पाहिजे, रेशनकार्डमध्ये भेदभाव न ठेवता ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे, रेशनमध्ये गहू, तांदळाबरोबर साखर, डाळी, खाद्यतेल, इत्यादी जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक कार्डधारकाला पाच लिटर रॉकेल मिळाले पाहिजे, घरगुती वीजबिल प्रत्येक महिन्याला न मिळता, तीन महिन्याने मिळावे, तालुक्यातील सरकारी जागेवर राहणाऱ्यांचे अतिक्रमण कायम करावे, जांभळीमधील कुटुंबीयांना घरटी एक प्लॉट द्यावेत, कुरुंदवाडमधील बेघरांना ताबडतोब जागा देऊन घरे बांधून द्यावीत, डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक करावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांसमोर जाहीर केले. यावेळी नारायण गायकवाड, नजीर मोमीन, नेत्रदीपा पाटील, भाऊसाहेब कसबे यांनी आपली मते मांडली. शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार सचिन गिरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गिरी यांनी सर्व मागण्या शासनास कळविण्याचे आश्वासन दिले. मोर्चात इराप्पा कांबळे, तायाप्पा कांबळे, कल्लाप्पा मल्लेवाडे, लक्ष्मण मगदूम, अरुण मांजरे, आक्काताई तेली, राजाराम सदलगे, बळवंत कांबळे, वत्सला भोसले यांच्यासह शिरोळ तालुक्यातील महिला व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)