शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेससह ‘माकप’ची निदर्शने

By admin | Updated: January 10, 2017 00:40 IST

नोटाबंदीविरोधात इचलकरंजीत निषेध : मलाबादे चौकात सरकारविरोधी घोषणा

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रीय युवक कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने भारतीय स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रासमोर म्हशी उभ्या केल्या. राष्ट्रीय युवक कॉँग्रेसने प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद केला, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मलाबादे चौकात निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदविला.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजीनगर येथील शहर कार्यालयात जमले. त्यांनी तेथून मोटारसायकल रॅली काढली व हे सर्वजण चांदणी चौकातील भारतीय स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रासमोर आले. ५० दिवस उलटले तरी बॅँका व एटीएम केंद्रांमध्ये चलनी नोटांची टंचाई भासत असल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी एटीएम केंद्रासमोर म्हशी उभ्या करून आगळेवेगळे आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरचिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, उदयसिंह पाटील, सचिन हुक्किरे, प्रधान माळी, बाळासाहेब देशमुख, आदी सुमारे २०० कार्यकर्त्यांनी भाग घेतला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.राष्ट्रीय युवक कॉँग्रेसचे कार्यकर्ते बंगला रोडवरील कॉँग्रेसच्या शहर कार्यालत जमले. तेथून ते प्रांत कार्यालयातील चौकात मिरवणुकीने गेले. त्याठिकाणी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात आणि काळा पैसा बाहेर काढण्याची मोहीम असल्याबद्दल घंटानाद करीत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. आंदोलनामध्ये अमृत भोसले, राजू बोंद्रे, बाळासाहेब माने, अनिल म्हालदार, प्रणव होगाडे, नजमा शेख, सुरेखा काटकर, आदींनी भाग घेतला. त्यानंतर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार मनोज ऐतवडे यांना निवेदन देण्यात आले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते दत्ता माने, शहर सचिव आनंदराव चव्हाण, आदींच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते मलाबादे चौकात एकत्र आले. त्यांनी चलनी नोटा बंद केल्याचा परिणाम कामगार, कष्टकरी जनतेवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. एक प्रकारची आर्थिक आणीबाणी उद्भवली असल्याबद्दल टीका केली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्वीस बॅँकेतून काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर चव्हाण, माने, शिवगोंड खोत, ए. बी. पाटील, सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, भाऊसाहेब सूर्यवंशी, बाळनाथ रावळ, सुभाष कांबळे, आदींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. (प्रतिनिधी)