शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

टोल स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालू

By admin | Updated: November 23, 2014 00:55 IST

सार्वजनिक बांधकाममंत्री : वेळ द्या; टोल शंभर टक्के घालवू

कोल्हापूर : राज्यात सध्या भाजप सरकार अस्थिरच्या अवस्थेत आहे. कोणत्याही हिंसात्मक मार्गाने टोलविरोधी आंदोलन करू नका. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरच्या टोलवसुलीसाठी परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कायदेशीर बाजू मांडून टोलवसुलीला स्थगिती आणण्यासाठी साकडे घालू, अशी माहिती आज, शनिवारी सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिली. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, टोल आंदोलनाच्या चळवळीत आम्हीसुद्धा होतो. कोणीही कायदा हातात घेऊ नका. काल, शुक्रवारी प्रभारी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी याबाबत चर्चा केली. कळंबा व उचगाव टोलनाक्यांवर जो प्रकार झाला आहे, तो समितीतील कार्यकर्त्यांनी केलेला नाही. २० डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ऊसतोड मजुरांचे, उसाचे भाव, दुष्काळ असे अनेक प्रश्न आहेत. राज्यावर ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे; तर २६ हजार कोटी महसुलाची तूट आहे. कऱ्हाड येथे उद्या, रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा आहे. त्यावेळी टोलसंदर्भातील भूमिका मांडू. एन. डी. पाटील म्हणाले, कोणत्याही पक्षाचे सरकार असू दे; टोल हटविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला टोलचा निर्णय द्यावाच लागेल. बैठकीस रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे यांच्यासह समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)