शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टोपजवळील अपघातात उत्तरेश्वर पेठेतील दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 16:06 IST

कोल्हापूर : मुलाच्या विवाह कार्यासाठी घुणकी (ता. हातकणंगले) येथे असलेल्या थोरल्या सुनेला आणण्यासाठी जात असताना पुणे-बेंगलोर महामार्गावरील टोपजवळ ताबा सुटून व्हॅन उलटल्याने कोल्हापूरातील उत्तरेश्वर पेठेतील दाम्पत्य ठार झाले तर अन्य तिघे जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. जखमींवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देटोपजवळ ताबा सुटून व्हॅन उलटल्याने अपघातव्हॅनमधून पाच जण, अन्य तिघे जण जखमी जखमींवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरु धनंजय महाडिकसह क्षीरसागर, नियाज खान यांच्याकडून विचारपूस...

कोल्हापूर : मुलाच्या विवाह कार्यासाठी घुणकी (ता. हातकणंगले) येथे असलेल्या थोरल्या सुनेला आणण्यासाठी जात असताना पुणे-बेंगलोर महामार्गावरील टोपजवळ ताबा सुटून व्हॅन उलटल्याने कोल्हापूरातील उत्तरेश्वर पेठेतील दाम्पत्य ठार झाले तर अन्य तिघे जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. जखमींवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरु आहेत.अन्वर रमजान शेख (वय ५५, रा. गोंधळी गल्ली, उत्तरेश्वर पेठ) आणि त्यांची पत्नी आसिफा ( ४८) अशी मृतांची नांवे आहेत. घटनेनंतर उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती.याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, मृत अन्वर शेख यांचा धाकटा मुलगा आझिम यांचा विवाह आठ सप्टेंबर २०१७ रोजी आहे. अन्वर यांची थोरली सुन घुणकी येथे माहेरी बाळंतपणााठी गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी अन्वर, त्यांची पत्नी आसिफा तसेच रिझवाना सलीम शेख (वय ४०), सुफिया युनूस सुरगून शेख (वय १३, दोघी रा. उत्तरेश्वर पेठ) आणि चालक नईम सुलतान शेख (३० रा. मस्कुती तलाव, उत्तरेश्वर पेठ) हे पाच जण व्हॅनमधून उत्तरेश्वर पेठ येथून निघाले.पुणे-बेंगलोर महामार्गावरील टोप येथील शेतकरी संघाच्या पेट्रोलपंपाजवळ ब्रेक आॅईल जाम झाल्यामुळे अचानक व्हॅन उलटली. या अपघातात पाचही जण जखमी झाले. त्यांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचार सुरु असताना अन्वर व त्यांची पत्नी आसिफा यांचा मृत्यू झाला.

मृत अन्वर शेख हे पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. दरम्यान, हा प्रकार समजताच उत्तरेश्वर पेठेतील नागरिक सीपीआर आवारात जमले.सुफिया शेख,रिझवाना शेख व नईम शेख यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.धनंजय महाडिकसह क्षीरसागर, नियाज खान यांच्याकडून विचारपूस...

टोप येथे अपघात झाल्याचे समजताच खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, परिवहन सभापती नियाज खान, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी आदींनी सीपीआरला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.=============फोटो : ३१०८२०१७-कोल-अन्वर अ‍ॅण्ड आसिफा शेख, टोप अ‍ॅक्सिडेंट