शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे समुपदेशन--नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:10 IST

हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनधारकांची यादी तयार करून त्यांना समुपदेशनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सकाळी नऊ ते १० व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस

ठळक मुद्देजिल्ह्यातील शाळा-कॉलेज प्रशासनांनी येथे सहलींचे आयोजन करावे, असे आवाहन निरीक्षक गुजर यांनी केले आहे. 

कोल्हापूर : हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनधारकांची यादी तयार करून त्यांना समुपदेशनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सकाळी नऊ ते १० व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस गार्डनमध्ये ट्रॅफिक पार्कच्या ठिकाणी समुपदेशन केले जाणार आहे. नोटिसीकडे दुर्लक्ष करून हजर न राहणाºया वाहनधारकांवर आदेश उल्लंघनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली. 

शासनाच्या डिसेंबर २०१५ च्या आदेशानुसार हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणाºया वाहनधारकांना रस्ता सुरक्षा आणि नियमांचे समुपदेशन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. अपघातात गंभीर जखमी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखा समुपदेशन करणार आहे. त्यासाठी पोलीस मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या ट्रॅफिक पार्कच्या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी नियमभंग केलेल्या वाहनधारकांना बोलावून तेथे माहिती दिली जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी; तसेच मनोरंजनातून वाहतुकीचे धडे मिळावेत यासाठी ट्रॅफिक पार्क तयार केला आहे. या ठिकाणी स्वयंचलित लाईट सिग्नल, फूटओव्हर ब्रिज, वळणरस्ते तयार केले आहेत. वाहतूक सेवेचे पोलीस त्यांची माहिती देत आहेत. या पार्कचे कामकाज पाहण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल देसाई यांची कायमस्वरूपी नेमणूक केली आहे.सहलींचे आयोजन कराशहरासह ग्रामीण भागांतील शाळांनी मुलांना वाहतुकीचे नियम समजावेत, त्यातून त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी ट्रॅफिक पार्कला भेट द्यावी. या मुलांना संपूर्ण पार्क फिरून दाखवणे, माहिती देणे यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांचीनेमणूक केली आहे; त्यामुळे जिल्ह्यातील शाळा-कॉलेज प्रशासनांनी येथे सहलींचे आयोजन करावे, असे आवाहन निरीक्षक गुजर यांनी केले आहे.  

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी