शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सिमेंट विक्रेत्याची आत्महत्या कारमध्ये विष प्यायले : ताण-तणावातून कृत्य ?

By admin | Updated: May 9, 2014 00:33 IST

कोल्हापूर : येथील शाहू जकात नाक्यासमोरील वैभव हौसिंग सोसायटीच्या माळावर कारमध्ये सिमेंट विक्रेत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला.

 कोल्हापूर : येथील शाहू जकात नाक्यासमोरील वैभव हौसिंग सोसायटीच्या माळावर कारमध्ये सिमेंट विक्रेत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. राजीव वसंतराव कुडाळकर (वय ३५, रा. अथर्व टॉवर, ताराबाई पार्क) असे त्यांचे नाव आहे. व्यावसायिक ताण-तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज गोकुळ शिरगाव पोलिसांनी वर्तविला आहे. या आत्महत्येचे वृत्त शहरात पसरताच व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहू जकात नाक्यासमोरील वैभव हौसिंग सोसायटीच्या पूर्वेकडील माळावर दुपारी बाराच्या सुमारास एका पांढर्‍या रंगाची कार येऊन थांबली. ही कार दुपारी साडेचारपर्यंत बेवारस स्थितीत त्याच जागी थांबल्याने परिसरातील नागरिकांना शंका आली. त्यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता चालकाच्या सीटवर तरुण मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्यांनी गोकुळ शिरगाव व करवीर पोलिसांना ही माहिती दिली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारची पाहणी केली असता कारचे दरवाजे लॉक होते. आतमध्ये चालकाच्या सीटवर तरुण निपचित पडलेला दिसला. पोलिसांनी बनावट चावीने गाडीचे दरवाजे उघडले. गाडीतून तरुणास बाहेर काढून त्याच्या खिशामध्ये ओळख पटण्यासाठी काही सापडते का याची पाहणी केली असता ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना मिळाले. त्यावरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता त्यांचा शाहूपुरी तिसर्‍या गल्लीमध्ये सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या ताण-तणावातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह सीपीआर शवागृहात आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांसह मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती. तोंडात रूमालाचा बोळा राजीव कुडाळकर यांच्या तोंडात रूमालाचा बोळा असल्याने घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. श्वान- पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. परंतु, तसा काही प्रकार आढळून आला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले. कुडाळकर यांनी विष प्राशन केल्यानंतर उलट्या होऊन त्रास होणार तसेच आवाजाने परिसरातील नागरिकांना कळेल हे लक्षात घेऊन त्यांनी तोंडात रूमालाचा बोळा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.(प्रतिनिधी)