शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेत मृत माशांचा खच

By admin | Updated: November 11, 2015 23:38 IST

शिरोळमधील प्रकार : नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी

कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने नदीला काळेकुट्ट पाणी आले आहे. तसेच पाण्याला उग्र वास येत असून, तेरवाड बंधाऱ्यात मृत माशांचा थर पडला आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान, पंचगंगा नदीकाठी मृत माशांचा थर पडल्याचे समजताच नदी प्रदूषण विरोधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देणारे अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळेच येथील नागरिकांना दूषित पाण्याला सामोरे जावे लागत असून, इचलकरंजी नगरपालिका व इचलकरंजी सीईटीपीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या आठ दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणी आटल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत असतानाच धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा व ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडल्याने पंचगंगा नदीपात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे.धरणातील पाण्यापेक्षा सांडपाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने पाणी काळेकुट्ट बनले आहे. तेरवाड बंधाऱ्यातून पाणी विसर्ग होताना फेसाळत असून, त्याचा उग्र वास येत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटल्याने नदीपात्रातील मासे तडफडून मरून पडत आहेत. लहान-मोठ्या मृत माशांचा मोठा थर तेरवाड बंधाऱ्यावर येऊन साचला आहे. बुधवारी सकाळी मासेमारी करणाऱ्या बागडी समाजातील नागरिकांनी मृत मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. तसेच बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गाबरोबर मासेही वाहून जात होते. दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औद्योगिक सांडपाणी जबाबदारपंचगंगेत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंतच्या औद्योगिकीकरणाचे पाणी सोडल्याने उन्हाळ्यात नदीतील मासे मरून पडत असत. यावेळी मात्र तेरवाड बंधाऱ्यातच मासे मरून पडल्याने इचलकरंजी शहरातीलच औद्योगिकीकरणाच्या सांडपाण्यामुळे मासे मेले आहेत, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला इचलकरंजीतील औद्योगिक कारखानेच जबाबदार आहेत.