शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजा !

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : शहरातील बहुतांश भागात दूषित पाणी येत आहे. प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. लोक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना चांगले पाणी पाजा, असा घणाघात नगरसेवक आदिल फरास, माजी महापौर जयश्री सोनवणे व लीला धुमाळ यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. दूषित पाण्याची बाटलीच अधिकाऱ्यांसमोर धरत सोनवणे यांनी ‘हे पाणी प्या अन् हजार रुपये मिळवा’ असे आव्हान दिले. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.नागाळा पार्क, वाय. पी. पोवारनगर, आदी परिसरातील नळाला गेले अनेक दिवस दूषित व काळे पाणी येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही उपाय योजत नाहीत. त्यामुळे चिडलेल्या नगरसेवकांनी आजच्या सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी, पाईपलाईन जोडणी व रस्त्यांची कामे सुरू असल्याने असा प्रकार घडला असावा. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.खुली जागा नागरिकांना खरेदी करून देण्यापूर्वी इतर सत्ताप्रकार काढून ती निर्वेध करून द्यावी, अशी प्रकाश नाईकनवरे यांनी केलेली मागणी मान्य करीत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ‘बी-टेन्युअर’ काढूनच मिळकती देण्याचे आदेश दिले. कुष्ठरोगींना दरमहा हजार रुपये देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. अपंग कल्याण निधीतील मंजूर ५० लाखांचा निधी अपंग व्यक्तींना सन्मानाने वाटप करा, यासाठी एक खिडकी योजना राबवा, अशी सूचना आदिल फरास यांनी केली. कुष्ठरोगींना प्रथम पैसे वाटप करून उर्वरित पैसे अपंगांच्या संवर्धनासाठी खर्च करण्याची मागणी भूपाल शेटे यांनी केली. अपंग संघटनांची बैठक घेऊन शासकीय योजना व निधीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या स्थापनेपासून १९७४ नंतर आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या सुचीमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने नव्याने नोकरभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना राजेश लाटकर यांनी केली.सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंदकोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० एमएम जाडीच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम सोमवार (दि. १)पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस शहरातील ए, बी व ई या वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे शहरवासीयांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना टॅॅँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली असून, काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन जलअभियंता मनीष पोवार यांनी के ले आहे. सोमवारी दिवसभर गळती काढण्याचे काम सुरू राहणार आहे. मंगळवारी (दि. २) काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर: साळोखेनगर पाण्याची टाकी परिसर, आपटेनगर, महाराष्ट्रनगर, बापूरामनगर, दादू चौगलेनगर व परिसर, जरगनगर, रामानंदनगर परिसर, रायगड कॉलनी, पोवार कॉलनी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहरनगर, वाय. पी. पोवारनगर, ई वॉर्डातील शाहूपुरीतील काही भाग, कावळा नाका परिसर, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, टाकाळा, संपूर्ण राजारामपुरी ,शाहू मिल, उद्यमनगर, सम्राटनगर, जागृतीनगर, राजेंद्रनगर, आदी.अनधिकृत बांधकामास बगलनगरसेविका सरस्वती पोवार यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. या प्रकरणाच्या न्यायालयामार्फत चौकशीचा विषय प्रशासनाने सभेपुढे ठेवला. परंतु, चौकशीला परवानगी दिल्यास पोवार यांचे पद धोक्यात येणार आहे, तर नामंजूर केल्यास नगरसेवकच अनधिकृत बांधकामास पाठीशी घालतात, असा आरोप होणार आहे. त्यामुळे सभागृहाची गोची करणारा हा विषय पुढील सभेत चर्चेसाठी घेण्याचे ठरले.तासाभरात सभा संपलीइतरवेळी अकरा वाजता सुरू होणारी सभा एक वाजता सुरू होई अन् चर्चेचे गुऱ्हाळ चार वाजेपर्यंत चालत असे. मात्र, आजची सभा बारा वाजता सुरू होऊन पाऊण तासात संपली. वास्तुशांती व लग्नाचे मुहूर्त असल्याने सभा लवकर गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे.महापालिका सभेत प्रशासन धारेवरजैवकचरा निर्मूलनाचा ‘एस. एस.’ ला ठेकानवीन कर्मचाऱ्यांची सुची करणारकुष्ठरोगींना मासिक हजार रुपये मानधनशाहू जलतरण तलाव चालविण्यास देणारअपंगांना योजनांची माहिती देणार