शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

करिअरविषयक प्रश्नांना मिळणार अचूक उत्तर

By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ : कोल्हापूर, सांगलीत आयोजन

कोल्हापूर : करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असलेले ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन दि. १३ ते १५ जूनदरम्यान कोल्हापूरमध्ये आणि सांगली येथे १७ व १८ जूनला होणार आहे. प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती ‘एकाच छताखाली’ उपलब्ध होणार आहे. ‘लोकमत’ समूहाने ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूरमध्ये १३ ते १५ जून या कालावधीत राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात, तसेच सांगलीमध्ये १७ व १८ जूनला मिरज रोडवरील कच्छी समाजभवनात हे प्रदर्शन होईल. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरसाठीच्या, शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्या शंकांचे निराकरण आणि प्रश्नांना अचूक उत्तरे या प्रदर्शनात मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्र्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. त्यामुळे प्रदर्शनातील स्टॉल नोंदणीसाठी राहुल गजबर (९९२२९४४००१) आणि राजू घाटगे (९८५०३०४१७५) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)नामांकित शिक्षण संस्थांचा सहभाग...मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या क्षेत्रांतील नामांकित शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.