शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

निविदांच्या टक्क्यांवरच नगरसेवकांचा मलिदा कुरुंदवाडमध्ये इच्छुकांची रणधुमाळी : जनतेतून नगराध्यक्ष निवडीमुळे नगरसेवकांची गोची

By admin | Updated: October 21, 2016 01:49 IST

निविदांच्या टक्क्यांवरच नगरसेवकांचा मलिदा कुरुंदवाडमध्ये इच्छुकांची रणधुमाळी : जनतेतून नगराध्यक्ष निवडीमुळे नगरसेवकांची गोची

गणपती कोळी --कुरूंदवाड--नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ चालू झाली आहे. मात्र, नवीन सभागृहातील सदस्यांना विधान परिषदेचा मलिदा मिळणार नसल्याने शिवाय नगराध्यक्ष निवडही थेट जनतेतून होणार असल्याने नगराध्यक्ष निवडीची उलाढालही ठप्प होणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहणाऱ्या नगरसेवकांना पालिकेच्या केवळ मर्यादित निविदांवरील टक्क्यांवरच समाधान मानावे लागणार आहे.लोकशाहीत लोकप्रतिनिधीला विशेष महत्त्व असते. लोकप्रतिनिधी हा पूर्णपणे समाजसेवक म्हणून असतो. शासन व जनतेचा सेवाभावी मध्यस्थ म्हणून या लोकप्रतिनिधींकडे पाहिले जाते. मात्र, अलीकडील काळात नगरसेवकामधील सेवक हा भाग लुप्त झाला आहे. निवडून आल्यानंतर मतदारांसाठी खर्ची घातलेले लाखो रुपये काढण्यासाठी बहुतेक नगरसेवक गुंतलेले असतात. त्यामुळे राजकारणाचे व्यावसायिकीकरण झाले आहे. पालिकेतील प्रत्येक निविदेवर नगरसेवकांची ठरलेली टक्केवारी नेहमी चर्चेत असते. इतकेच नव्हे, तर अलीकडे निविदा मंजूर करण्यासाठीही ठेकेदाराला किंमत मोजावी लागते. याचा परिणाम विकासकामांच्या दर्जावर होत असला, तरी नगरसेवकांना याचे सोयरसुतक राहिले नाही.नगरसेवकांना पालिकेतील निविदांच्या टक्क्यांपेक्षा अधिक आकर्षण असते ते विधान परिषद निवडणूक व नगराध्यक्ष निवडीतील उलाढालीवर. विधान परिषदेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सभापती यांना असतो. मर्यादित मतदार असल्याने या निवडणुकीत मातब्बर मंडळी उतरून मतदारांची मते थेट विकत घेतात. त्यातच गत विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक, अशी प्रतिष्ठेची निवडणूक लागल्याने मतदारांना ‘मँुह माँगे दाम’ तर मिळालेच, शिवाय १५ ते २० दिवस स्वर्गातील सुखे भोगली. ही निवडणूक दर सहा वर्षांनी होत असल्याने नवीन सभागृहाला विधान परिषदेचा मलिदा मिळणार नाही, हे मात्र निश्चित.नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवड असल्याने नेत्यांनी अनेकांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे नगराध्यक्ष निवडीत नगरसेवक आपल्याच बाजूने राहावेत, यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार, नेते नगरसेवकांना खुष करण्यासाठी सहलीबरोबरच भरघोस आर्थिक पाकिटांचे नियोजनही केले जाते. मात्र, आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने यातील आर्थिक उलाढाली ठप्प होणार असल्याने नगरसेवकांच्या आर्थिक उत्पन्नात कमालीची घट येणार आहे. त्यामुळे नगरसेवकपदाला उत्पन्नाचे साधन म्हणून पाहणाऱ्या नगरसेवकांना केवळ पालिकेच्या निविदांवरील टक्क्यांवरच समाधान मानावे लागणार आहेपालिकेतील प्रत्येक निविदेवर नगरसेवकांची ठरलेली टक्केवारी नेहमी चर्चेत असते. इतकेच नव्हे, तर अलीकडे निविदा मंजूर करण्यासाठीही ठेकेदाराला किंमत मोजावी लागते.थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने यातील आर्थिक उलाढाली ठप्प होणार.