शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
3
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
4
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
5
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
6
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
7
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
8
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
9
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
10
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
11
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
12
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
14
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
15
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
16
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
17
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
18
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
19
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
20
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

नगरसेवक प्रभागातला की उपरा ? संभाजीनगर बसस्थानक प्रभागात मोठी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:23 AM

विद्यमान नगरसेवक-महेश आबासो सावंत भारत चव्हाण / लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पालिकेच्या प्रभाग क्रमांक-५६ संभाजीनगर बसस्थानक प्रभागात यंदा ...

विद्यमान नगरसेवक-महेश आबासो सावंत

भारत चव्हाण / लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पालिकेच्या प्रभाग क्रमांक-५६ संभाजीनगर बसस्थानक प्रभागात यंदा ‘प्रभागातील’ आणि ‘उपरा’ उमेदवार असा सामना रंगणार आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत, उमेदवार व त्यांचे राजकीय पक्षही अजून निश्चित झालेेले नाहीत तोवरच हा मुद्दा चर्चेत आणला जात आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य कष्टकरी व स्वाभिमानी मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

२००५ ते २०१० तसेच २०१५ ते २०२० अशी दहा वर्षे राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश आबासो सावंत संभाजीनगर प्रभागाचे नेतृत्व केले. मतदारांना दहा वर्षांनंतर नवीन चेहरा लागतो. सावंत यांच्याबद्दल प्रभागात काहीशी नाराजी दिसून आली. निवडणुकीस ते स्वत: उभे राहिले असते तर कदाचित त्यांना नाराजीला सामोरे जावे लागले असते. परंतु ‘नागरिकांचा मागास वर्ग-महिला’ असे आरक्षण पडल्यामुळे सावंत यांनी आपसूकच या प्रभागावरील हक्क सोडून राजलक्ष्मीनगर प्रभागाकडे मोर्चा वळविला आहे.

राष्ट्रवादीकडून माजी महापौर सुनीता अजित राऊत, काँग्रेसकडून यशोदा मोहिते व शिवसेनेकडून संध्या सागर टिपुगडे या प्रमुख उमेदवारांसह शहाजी वसाहतमधील प्रणोती महेश पाटील, सविता गुरव याही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. प्रभागात उमेदवारांचीही वाणवा असल्याचे दिसते. कटर शिवसैनिक अशी ओळख असणारे माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे व माजी नगरसेविका अरुणा टिपुगडे यांची स्नुषा संध्या सागर टिपुगडे या शिवसेनेच्या उमेदवार असतील. टिपुगडे प्रभागातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांनी स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्याची साद मतदारांना घातली आहे. निवडणुकीत उपरे येतील, पण आम्ही कायम मतदारांसोबत असल्याचा दावा टिपुगडे यांनी केला आहे.

सुनीता अजित राऊत वेताळ तालीम परिसरात राहणाऱ्या असून, त्यांनी त्यांचा पद्माराजे उद्यान हा प्रभाग अर्जना उत्तम कोराणे यांच्यासाठी सोडला आहे. त्याच्या बदल्यात राऊत यांना उत्तम कोराणे व महेश सावंत यांनी संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. तीन उमेदवारांतील तडजोड असल्याने मतदार कितपत साथ देतात हा महत्वाचा मुद्दा आहे. सुनीता व त्यांचे पती अजित महापालिकेतील आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जातात. आयआरबी रस्त्यांच्या आंदोलनात महापौर असताना सुनीता यांनी टोल मागणाऱ्यांना चप्पल दाखविण्याचे धाडस केले होते. त्यांनी पद्माराजे उद्यान प्रभागात विकासाची अनेक कामे केली आहेत. त्या कामांची ओळख येथील मतदारांना करून देण्यासह भविष्यातील विकासकामे करण्याचे आश्वासन ते देत आहेत.

यशोदा मोहिते गतवेळची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढल्या होत्या. त्यांचे पती कै. प्रकाश मोहिते ताराराणी आघाडीचे नगरसेवक होते. त्यामुळे यशोदा यांना भाजप, ताराराणी यांचे तर तिकिटासाठी आमंत्रण आहेच, शिवाय काँग्रेसनेही त्यांच्याकडे संपर्क साधून तिकीट घेण्याची विनंती केल्याची चर्चा प्रभागात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा, प्रभागातील कानोसा घेऊनच त्या पक्ष निश्चित करणार आहेत. यशोदा यांनी यापूर्वी नगरसेवकपद भूषविले आहे.

० प्रभागात झालेली कामे -

- पिण्याच्या पाण्याचा सर्व प्रभागातील प्रश्न सोडविला.

- जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकल्या आहेत.

- शहाजी वसाहतीत ड्रेनेज, गटर, काँक्रिट पॅसेज रस्ते केले.

- सरनाईक कॉलनीत ड्रेनेज, गटारी, रस्त्यांची कामे

-राजकपूर पुतळा ते राजाराम चौक रस्ता व ड्रेनेजची कामे पूर्ण.

- प्रभागातील शिल्लक कामे -

- सरनाईक कॉलनीतील पाण्याचा लोढा रोखण्याचे काम.

- राजकपूर पुतळा चौकात नवीन चेंबर बांधण्याचे काम.

- कदमखाण परिसरात सांडपाणी निर्गतीचे काम.

० प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते -

- महेश आबासो सावंत (राष्ट्रवादी) - १५०८

-यशोदा प्रकाश मोहिते (भाजप) - ११०८

- दत्ताजी विलास टिपुगडे (शिवसेना) ९१८

-अमर जरग (काँग्रेस) २४१

- प्रताप पाटील (अपक्ष) २६८)

० नगरसेवकाचा कोट -

प्रभागातील सर्वच कामे पूर्ण करता आली नसली तरी नव्वद टक्के कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सर्वच लोक समाधानी होतील असे नाही, परंतु जास्तीत जास्त लोकांची कामे केली. काही कामे आता सुरू झाली आहेत. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत प्रभागातील विकास दिसून येईल.

महेश सावंत