शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेने सभागृहात आणले डिझेल

By admin | Updated: May 13, 2017 00:16 IST

नगरसेविकेने सभागृहात आणले डिझेल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रभागात वाढलेला डासांचा उपद्रव पाहून धूरफवारणी करा, अशी वारंवार मागणी करूनही केवळ डिझेल नसल्याचे कारण सांगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध करण्याकरिता नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी शुक्रवारी चक्क स्थायी समितीच्या सभेत डिझेलचा कॅन भरून आणला. ‘आम्ही डिझेल देतो; पण प्रभागात धूर फवारणी करा,’ अशी विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी खजिल झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने धूरफवारणी करण्याची ग्वाही दिली. कॉमर्स कॉलेज प्रभागात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढला आहे. याकडे नगरसेविका आजरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले; परंतु केवळ डिझेल नाही, असे कारण सांगून वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी करीत होते. शेवटी आजरेकर यांनी मी स्वत: डिझेल खरेदी करून देते. तुम्ही तुमची यंत्रे घेऊन या आणि धूरफवारणी करा, अशी विनंती त्या करीत होत्या. तरीही अधिकारी त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या आजरेकर शुक्रवारी स्थायी समिती सभा सुरू असताना चक्क डिझेलचा कॅन व पेट्रोलची बाटली घेऊन पोहोचल्या. महानगरपालिकेला धूरफवारणी यंत्रे चालविण्यासाठी जर डिझेल खरेदी करता येत नसेल, तर हे डिझेल घ्यावे आणि आमच्या प्रभागात फवारणी करावी, अशी विनंती आजरेकर यांनी सभेत केली. त्यांच्या या गांधीगिरीमुळे वरिष्ठ अधिकारीही खजिल झाले. त्यांनी संबंधितांना डिझेल खरेदी करून तातडीने धूरफवारणीच्या सूचना दिल्या. ‘ई’ वॉर्डसाठी टाकलेली जलवाहिनी कधी सुरू करणार? अशी विचारणा आशिष ढवळे यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावेळी शेंडा पार्कजवळ सोमवारी क्रॉस कनेक्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर पुईखडीवरून थेट टेंबलाईवाडी व कावळा नाका येथील टाकीत पाणी पडणार आहे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी चर्चेत प्रतिज्ञा निल्ले, जयश्री चव्हाण, अफजल पीरजादे, राहुल माने, कविता माने, आदींनी भाग घेतला. झूम प्रकल्पावरील इनर्ट मटेरिअल हलविण्यासाठी आलेल्या सात निविदांपैैकी तीन निविदा टेक्निकल बिडमध्ये पात्र ठरल्या. यासंबंधीची निविदा मंजूर करताना निलोफर आजरेकर यांचा विरोध नोंदविला.