शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:37 IST

जातीचा दाखला अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्द करण्यात आलेल्या कोल्हापूरच्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद अबाधित राहिले आहे.

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली स्थगितीरामाणे यांचे नगरसेवकपद अबाधित कळंबा, रायगड कॉलनी परिसरात फटाके, समर्थकांचा जल्लोषकारागृह प्रभाग पोट निवडणूक होणार रद्द

कोल्हापूर , दि. १२ : जातीचा दाखला अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्द करण्यात आलेल्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद अबाधित राहिले आहे.जात पडताळणी समितीने अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिल्याने रामाणे यांचे नगरसेवकपद आता कायम राहिले आहे. यामुळे महानगरपालिकेने सुरु केलेली शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागाची पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द होणार आहे.यासंदर्भातील प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर सुरु होईल. न्यायालयात रामाणे यांच्या बाजूने अ‍ॅड. तानाजी मातुगडे यांनी युक्तिवाद केला.दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर कळंबा, रायगड कॉलनी परिसरात फटाके वाजवून रामाणे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.कोल्हापूरच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद जानेवारी २0१७ मध्ये रद्द करण्यात आले होते. जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जात पडताळीत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरविल्यानंतर कोल्हापूर पालिकेचे विभागीय आयुक्त पी.शिवशंकर यांनी नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई केली.

अश्विनी रामाणे यांचं नगरसेवक पद रद झाल्यानं काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला होता. महापौरपदाच्या निवडणुकीत अश्विनी रामाणे यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपच्या सविता भालकरांचा पराभव केला होता. मात्र, जातीचा दाखला अवैध ठरविल्यानंतर रामाणे यांचे नगरसेवक पदच रद्द झाले होते.