शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

कोल्हापूर २०० कोटींचा कॉर्पोरेट गणेशोत्सव

By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST

प्रसिद्ध मंडळे कंपन्यांच्या रडारवर : प्रायोजकत्वापोटी मोठी किंमत; महापालिकेच्या हक्काच्या उत्पन्नावर मात्र गदा

संतोष पाटील - कोल्हापूर -गणेशोत्सव फिव्हर कॅच करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या जाहिरातीसाठी मंडळांच्या माध्यमातून उतरल्याने मुंबई-पुण्याप्रमाणेच कोल्हापूरच्या गणेशोत्सवास आता कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. जाहिरातीपोटी मोठमोठ्या रकमा या कंपन्यांनी मंडळांना मोजल्या आहेत. आरास, रंगरंगोटीपासून मुहूर्तावरील खरेदी तसेच सार्वजनिक मंडळांकडून होणारा कोट्यवधींचा खर्च यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील उलाढाल २०० कोटी रुपये होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने इच्छुकांनीही हात ढिले केल्याने मंडळांची चंगळ सुरू आहे.कोल्हापूर शहरात धर्मादाय कार्यालयाकडील आकडेवारीनुसार ३,२९५ तरुण मंडळे आहेत. किमान २५ हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत ही मंडळे उत्सवासाठी खर्च करतात. ग्रामीण भागात दोन हजारांहून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे सरासरी खर्च १० ते ५० हजार रुपये उत्सव काळात खर्च करतात, अशी माहिती धर्मादाय आयुक्तकार्यालयात मंडळांनी जमा केलेल्या हिशेबावरून समजते. जिल्हा नियोजन आराखड्यानुसार कुटुंबांची संख्या ८ लाख ८० हजार आहे. यातील तब्बल पाच लाखांहून अधिक कुटुंबे घरगुती गणेशोत्सव साजरा करतात. आरास, रंगरंगोटी, सजावट आदींसाठी प्रती कुटुंब सरासरी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करतात. याव्यतिरिक्त कपडे, घरगुती साहित्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी होणारा खर्च वेगळाच आहे. यंदाच्या उत्सवकाळात होणारी एकूण उलाढाल दोनशे कोटींपेक्षा अधिक असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.साहित्य, सिमेंट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या मोठ्या जाहिराती३२९५ तरुण मंडळांंची नोंद३३५हून अधिक चौकांत जाहिरातीदीड हजाराहून अधिक कमानीलाखोंच्या महसुलाला ठेंगाकरबुडव्या कंपन्यांवर फौजदारीचा बडगाकाही कंपन्यांनी प्रामाणिकपणे परवानगी घेतली आहे. बहुतांश कंपन्यांनी पूर्ण तपशील अद्याप दिलेला नाही. याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. सार्वजनिक क्षेत्र विद्रुपीकरण कायदा २००५ नुसार परवानगीशिवाय जाहिराती करणाऱ्या कंपन्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नोटिसीला वेळेत व पूरक उत्तरे न देणाऱ्या कंपन्यांवर महापालिका फौजदारी दावे दाखल करणार आहे.- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)