शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : नियमित प्रवाशी ट्रेन सुरू होणार ?, वैद्यकीय तपासणी यंत्रणा उभारण्याबाबत रेल्वेला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:28 IST

कोल्हापूर  :  नियमित प्रवाशी ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी यंत्रणा रेल्वेने ...

ठळक मुद्देनियमित प्रवाशी ट्रेन सुरू होणार ?वैद्यकीय तपासणी यंत्रणा उभारण्याबाबत रेल्वेला सूचना

कोल्हापूर  :  नियमित प्रवाशी ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी यंत्रणा रेल्वेने उभी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.   जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केंपी-पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिवन अल्वारीस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,  सहाय्यक विभागीय सिग्नल आणि टेलीकम्युनिकेशन अभियंता राजीव कुमार जैन, समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोल्हापूरमध्ये येणाऱ्या रेल्वेतील प्रत्येक प्रवाशांची तपासणी थर्मल स्कॅनींगने करा, रेल्वे विभागाने एक दिवस आधी येणाऱ्या प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनाला द्यावी, त्यानुसार संबधित विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकाला बॅरिकेटींग करावे.

बाहेर जाण्यासाठी आणि प्रवेशासाठी असे दोनच मार्ग खुले ठेवावेत वैद्यकीय पथकासाठी स्वतंत्र कक्ष करावा परिवहन विभागाने प्रवाशांच्या वाहतूक सोयीबाबत नियोजन करावे. संबंधित प्रत्येक विभागाचा एक नोडल अधिकारी यासाठी नियुक्त करावा, असेही ते म्हणाले.मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यावेळी म्हणाले येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा स्वॅब घेण्यासाठी स्वतंत्र सुविधा रेल्वेने उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर संबंधित प्रवाशी ज्याठिकाणी जाणार आहे अथवा ज्या ठिकाणाहून बसलेला आहे याबाबतची माहिती उपलब्ध करून द्यावी.

सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि प्रत्येक प्रवासाची तपासणी होण्याच्या दृष्टीने रेल्वे फलाटावरच एका रांगेत योग्य अंतर ठेवून प्रवासी बाहेर आणण्याची सुविधा रेल्वेने आधीच करावी, अशी सूचना डॉ. देशमुख यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर