शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

CoronaVirus Lockdown : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:10 IST

रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नोंदणी केलेल्यांबाबत शासनाकडून काही निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल. या व्यतिरिक्त परजिल्ह्यांसह परराज्यांतूनही कोल्हापुरात येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे.

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार परजिल्ह्यांसह राज्यातूनही येणाऱ्यांचा मोठा ओघ

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नोंदणी केलेल्यांबाबत शासनाकडून काही निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल. या व्यतिरिक्त परजिल्ह्यांसह परराज्यांतूनही कोल्हापुरात येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे.जिल्ह्यातून परराज्यांसह परजिल्ह्यांत जाण्यासाठी व परराज्यांसह परजिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली आहे. यावर येणाऱ्यांची व जाणाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. यामध्ये कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईहून एक हजार ९४१ जणांंनी, ठाण्याहून एक हजार ९६५ जणांनी व पुण्याहून दोन हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे.

हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने तसेच येथून येणाऱ्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोनमधील कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. रेड झोनमधील व्यक्तींनी बाहेर जाऊ नये व त्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, असे सरकारचेच निर्देश आहेत. परंतु यदाकदाचित यांना जिल्ह्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यास संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात येण्यासाठी परराज्य-परजिल्ह्यांतील नोंदणीजिल्ह्यात येण्यासाठी गुजरातहून १८२, गोवा ११७, तेलंगणा १०३, दिल्ली ७४, मध्यप्रदेश ३३, उत्तरप्रदेश २९, तमिळनाडू ४५, राजस्थान २५, आंध्रप्रदेश येथील २५ जणांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून पालघर ५२५, सांगली ३७३, सातारा २१३, रायगड ३८२, सोलापूर ८३, सिंधुदुर्ग ९०, नाशिक येथील ७४ जणांनी नोंदणी केली आहे.जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी नोंदणीजिल्ह्यातून परराज्यांत जाण्यासाठी उत्तर प्रदेश ६०५१, बिहार ३७५६, कर्नाटक २७५८, राजस्थान १९८८, पश्चिम बंगाल ८६६, झारखंड ७८०, गोवा ३२४, तमिळनाडू येथील ८२ जणांची नोंदणी झाली आहे; तर परजिल्ह्यांत जाण्यासाठी पुणे १६०६, सांगली ११३६, सातारा ३०८, रत्नागिरी ३१२, मुंबई २५३, सिंधुदुर्ग २३५, लातूर १७९, नाशिक १३५, नंदुरबार येथील १३६ जणांनी नोंदणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर