शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कम्युनिटी किचन; दोनवेळ घरच्यासारखे जेवण, नाष्टा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:13 IST

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी जाण्याची सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवारागृहातील व्यक्तींकडून करण्यात आली.

ठळक मुद्देदोनवेळ घरच्यासारखे जेवण, नाष्टासरस्वती मंगल कार्यालयातील कम्युनिटी किचन; ३६ जणांचा समावेश

कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी जाण्याची सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवारागृहातील व्यक्तींकडून करण्यात आली.जिल्हा प्रशासनाकडून या निवारागृहामध्ये दि. ३१ मार्चपासून महाराष्ट्रातील दोन आणि तमिळनाडू, केरळ, बिहार, उत्तरप्रदेशमधील ३४ जण आहेत. कुल्फी विक्रेते, सेल्समन, मजूर म्हणून काम करणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना सकाळी, सायंकाळी नाष्टामध्ये पोहे, उप्पीट, बिस्कीट, चहा दिला जातो.

जेवणामध्ये चपाती, भात, आमटी, भाजी देण्यात येते. कणेरी येथील श्री सिद्धगिरी मठाकडून भात, कढी दिली जाते. निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये सकाळी चपाती, भाजी, तर रात्री पूर्ण जेवण केले जाते. रॉबीनहूड आर्मी, अमर गांधी ग्रुप, संजय घोडावत ग्रुप, उजळाईवाडीतील विविध कॉलनींमधील नागरिकांकडून नाष्टा, जेवणासाठी मदत केली जात आहे.स्वयंस्फूर्तीने कामात मदतदिवसभर बसून वेळ जात नाही म्हणून या निवारागृहातील व्यक्ती स्वयंस्फूर्तीने त्याठिकाणी काम करतात. फरशी पुसणे, झाडून काढणे, जेवण करण्यासाठी मदत करणे, चहा-नाष्टा आणि जेवणाचे वाटप करणे, आदी स्वरूपातील कामे ते करीत आहेत.‘इतनी शक्ति हमे दे ना दाता’निवारागृहातील व्यक्तींच्या मनोरंजनासाठी प्रशासनाने गाणी ऐकण्याची सुविधा पुरविली आहे. त्यामुळे येथे सकाळी आणि सायंकाळी ‘इतनी शक्ति हमे दे ना दाता...’ या गीताचे सूर ऐकायला मिळतात.

याठिकाणी आम्हाला दोनवेळा घरच्यासारखे जेवण, नाष्टा मिळत आहे. कोणतीही अडचण नाही. माझं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीमुळे जीव टांगणीला लागला आहे.-ब्रीजभूषण, कानपूर, उत्तरप्रदेश

कृषी उत्पादनांचा सेल्समन म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून मिरज येथे काम करीत आहे. या निवारागृहात चांगली सुविधा आहेत. आम्हा सर्वांना लवकर घरी जाण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी.-रणजित, तमिळनाडू

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सोयी-सुविधा या निवारागृहातील व्यक्तींना पुरविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकरिता जेवण करण्यासाठी महिला आचारी नेमण्यात आली आहे. जेवणासाठी स्वयंसेवी संस्थांची देखील काही प्रमाणात मदत होत आहे.-बाळासाहेब सरगर, समन्वयक, निवारागृह 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर