शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : ‘बिरोबा’च्या देवळात बंटीदांनी थाटले स्वस्त धान्य दुकान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:46 IST

गडहिंग्लजच्या नव्या प्रभाग ९ चे नूतन नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी यांनी आपल्या वार्डातील गोरगरीबांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी येथील बिरोबाच्या देवळात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत नफेखोरीचा प्रकार सर्रास अनेक ठिकाणी सुरू असतानाच ‘बंटीदा’च्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे‘बिरोबा’च्या देवळात बंटीदांनी थाटले स्वस्त धान्य दुकान..!गडहिंग्लजचे नगरसेवक महेश कोरी यांचे फिरते दुकान

राम मगदूम

 गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या नव्या प्रभाग ९ चे नूतन नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी यांनी आपल्या वार्डातील गोरगरीबांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी येथील बिरोबाच्या देवळात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत नफेखोरीचा प्रकार सर्रास अनेक ठिकाणी सुरू असतानाच ‘बंटीदा’च्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.या प्रभागात काळभैरी रोडवरील डोंबारी वसाहतीसह मेटाचा मार्ग व दुंडगा मार्गावरील बेघर व भूमीहीनांची झोपडपट्टीदेखील आहे. खासकरून त्यांच्यासाठीच त्यांनी हे फिरते दुकान सुरू केले आहे. ना नफा..ना तोटा तत्वावर सुरू झालेले हे दुकान ठराविक दिवशी ठिकठिकाणी लावले जाणार आहे.गडहिंग्लज शहरातील होलसेल किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. त्याची वाहतूक ते स्वत: करतात. देवळातील दुकानात पॅकींग आणि विक्रीची सेवा संदीप पाटील, सूरज गवळी, अशोक माळगी व सुशांत पोवार हे विनामोबदला करत आहेत.बंटीदा ग्रुपतर्फे कोरोनाची साथ आपल्यापासून आजअखेर हातावर पोट असणाऱ्यांना तांदूळ, डाळ, बटाटे, कांदे आदी वस्तूचे ३६५ कीट मोफत वाटण्यात आले आहेत. दरम्यान, रक्तदान शिबीर झाले, नगरपालिका व पोलिस ठाण्यासमोर सॅनिटायझर झोन बुथ उभारण्यात आला आहे. त्यानंतरचा हा चौथा उपक्रम आहे. वस्तूंचे दर प्रतिकिलो असेतांदूळ २५ ते ३६ रूपये साखर ३६, तूरडाळ ९०, खाद्यतेल ९५, मूगडाळ १२६, शाबूदाणा ७०, पोहे ४५ असे येथील दर आहेत. ३ दिवसात ५२० लोकांनी ८९ हजाराची खरेदी केली आहे.

बाजारपेठेपासून दूर राहणाऱ्या गरीबांची पायपीट होवू नये, अडचणीच्या काळात त्यांना किमान धान्य तरी रास्त भावात मिळावे म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.- महेश कोरी, नगरसेवक.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर