कोल्हापूर : कोरोनाने समाजातील दुरावलेली रक्ताची नाती, रक्तदानाच्या उपक्रमामुळे पुन्हा जुळली, अशी प्रतिक्रिया आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केली.
‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त व विश्वविक्रम कांबळे युवा मंचच्यावतीने राजेंद्रनगरातील शिवाजीराव चव्हाण सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते. त्यांनी रक्तदान उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरात सुमारे ६२ जणांनी रक्तदान केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वविक्रम कांबळे, राजेंद्र साबळे, माजी परिवहन समिती सभापती लालासाहेब भोसले, आदी उपस्थित होते.
या उपक्रमात आमदार पाटील यांच्या उपस्थितीत विश्वविक्रम कांबळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला स्कूल बॅग भेट देण्यात आली. तसेच या भागातील सफाई कर्मचाऱ्यांचा मास्क व सॅनिटायझर देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिराला संजीवनी ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला नितीन घोडके, विजय सकट, गणेश कांबळे, रोहन शिंदे, सागर गेजगे, अक्षय सुतार, कृष्णा गायकवाड, लक्ष्मण भालेराव, कृष्णा कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो नं. १२०७२०२१-कोल-राजेंद्रनगर ब्लड कॅम्प
ओळ : कोल्हापुरात राजेंद्रनगरात ‘लोकमत’तर्फे व विश्वविक्रम कांबळे युवा मंचच्या सहकार्याने सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र साबळे, विश्वविक्रम कांबळे, नितीन घोडके, आदी उपस्थित होते.
120721\12kol_6_12072021_5.jpg
ओळ : कोल्हापूरात राजेंद्रनगरात ‘लोकमत’च्या वतीने व विश्वविक्रम कांबळे युवा मंचच्या सहकार्याने सोमवारी आयोजीत रक्तदान शिबीराचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेंद्र साबळे, विश्वविक्रम कांबळे, नितीन घोडके आदी उपस्थित होते.