शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात कोरोनाचा कहर एका दिवसात 17 पोजिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 17:34 IST

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे त्यामुळे यापुढे आरोग्य खात्याची चांगलीच धावपळ होणार असून नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेळगाव   ---आज आतापर्यंत सुरक्षितच आहोत असे अनुभवणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36 वर जाऊन पोचला आहे. यामध्ये काही ग्रामीण भागातही याची लागण झाली असून अतिदक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यामध्ये बेळगावचा एक रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे.नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या बुलेटीनमध्ये बेळगाव जिल्ह्यात एकूण 17 जणांना पुन्हा कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील 8 चिकोडी येथे एक, रायबाग येथे सात आणि बेळगाव(येळ्ळूर) येथे एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे यापुढे आरोग्य खात्याची चांगलीच धावपळ होणार असून नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाची संख्या वाढू लागली आहे. यामुळे सरकारने दिलेल्या नियमावलीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.आज पोजिटिव्ह आलेल्या 17 पैकी तीन रुग्ण दिल्ली मरकज मधून आलेले त्याची पुन्हा चाचणी पोजिटिव्ह तर उर्वरित 13 जण दुसऱ्या पोजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातून तर एक महाराष्ट्र मधील मिरज मधून असे प्रवास केलेले आहेत.काल पर्यंत एकूण 100 हुन अधिक जणांचे नमुन्यांची चाचणी अहवाल बाकी होती त्यापैकी हे रुग्ण पोजिटिव्ह आढळले आहेत.बेळगाव जिल्ह्यात याआधी 19 जणांना कोरोनाची लागून झाली होती. आता गुरुवारी सतरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली असून आरोग्य खात्यानेही आता अतिदक्षता घेण्याकडे लक्ष दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव तालुक्यात एकूण पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये टाकण्यात आला आहे. तर बेळगावला सध्या हॉट स्पॉट मध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे तीन किलोमीटर कोणीही असेल त्यांना ये-जा करण्यास मज्जाव असणार आहे. ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे तरी ग्रामीण भागातील नागरिकांनीनियमांचे पालन रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcorona virusकोरोना वायरस बातम्या