शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

corona virus : गावाची काळजी घेणाऱ्याला वाली कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:11 IST

कोरोनाच्या महामारीपासून गावाच्या संरक्षणाची काळजी वाहताना गडहिंग्लज तालुक्यातील ५ ग्रामसेवक व त्यांची १३ कुटुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे गावासाठी झटणाºया ग्रामसेवकाला वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे.

ठळक मुद्देगावाची काळजी घेणाऱ्याला वाली कोण ?गडहिंग्लज तालुक्यात ५ ग्रामसेवक, १३ कुटुंबीय बाधित

राम मगदूम

गडहिंग्लज : कोरोनाच्या महामारीपासून गावाच्या संरक्षणाची काळजी वाहताना गडहिंग्लज तालुक्यातील ५ ग्रामसेवक व त्यांची १३ कुटुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे गावासाठी झटणाऱ्या ग्रामसेवकाला वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे.गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या बाराशेच्या घरात पोहोचली असून दुर्देवाने आजपर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण चांगले असले तरी संसर्ग आणि मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लढाईतील सर्व घटकांसह जनतेतही भिती आहे.गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसेवक अहोरात्र झटत आहेत. एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला उपचारासाठी हलविण्याबरोबरच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून समूह संसर्ग टाळण्यासाठी ते डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. म्हणूनच ग्रामीण भागातील कोरोनाची साथ नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे.परंतु, कितीही काळजी घेतली तरी अनावधानाने बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ग्रामसेवकदेखील बाधित होत आहेत, त्याचा फटका त्यांच्या कुटुंबियांनाही बसत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसह त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.स्वतंत्र सेंटरची गरजबाधित ग्रामसेवकांना लवकर बरे होवून पुन्हा सेवेत रूजू होण्याकरिता त्यांच्यासाठी प्रसन्न वातावरणातील ह्यस्वतंत्र केअर सेंटरह्णची गरज आहे. तिथे वैद्यकिय उपचार, सकस आहार, समुपदेशन, मनोरंजन इत्यादीची व्यवस्था असावी. त्याठिकाणी त्यांच्या बाधित कुटुंबियांनाही उपचार घेता येतील. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गडहिंग्लजहमध्ये हे केंद्र उभे राहिल्यास राज्यातील अन्य तालुक्यांसमोरही एक आदर्श ठेवला जाईल.बीडीओंनी पुढाकार घ्यावाबीडीओ शरद मगर हे अत्यंत संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील अधिकारी आहेत. त्यांनी पुढाकार घेतल्यास ग्रामसेवक संघटनेसह लोकसहभागातून असे सेंटर उभे राहू शकते. त्यामुळे ग्रामसेवकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होईल. 

मानसिक तणावाखाली..!एका ग्रामसेवकाच्या कुटुंबातील १० जण, एकाच्या कुटुंबातील दोघेजण आणि पत्नीसह एकजण आजपर्यंत बाधित झाले आहेत. खाजगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडेनासा झाला असून सरकारी कोविड रूग्णालयात बेड उपलब्ध होईनात. म्हणूनच ते मानसिक तणावाखाली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर