कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, त्याचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन ५५२ संक्रमित रुग्ण आढळून आले.जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रुग्णालयातील खाटा आणि रोज नवीन येणाऱ्या रुग्णांची संख्या यांचा ताळमेळ बसत नाही. खाटांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक झाल्यामुळे आता रुग्णांच्या घरातच उपचार केले जाऊ लागले आहेत. ऑगस्ट महिन्यात ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबरमध्ये तर रोज हजार रुग्ण आढळून येऊ लागल्याने कोरोनाचे संकट किती गंभीर बनले आहे, हेच स्पष्ट होत आहे.गेल्या २४ तासांत नवीन ५५२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता २७ हजार ९८९ वर गेली आहे. १९ जणांच्या मृत्यूमुळे कोरोनाने मरणाऱ्याची संख्या ८४७ इतकी झाली आहे. १७ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे १९ मृत, ५५२ नवीन बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:57 IST
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, त्याचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन ५५२ संक्रमित रुग्ण आढळून आले.
corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे १९ मृत, ५५२ नवीन बाधित रुग्ण
ठळक मुद्देजिल्ह्यात १९ मृत, ५५२ नवीन बाधित रुग्ण कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ