कोरोची धनगर माळ येथील एकाच कुटुंबातील ही घटना आहे. ४ मे २०२१ रोजी माजी ग्रामपंचायत सदस्य जयसिंग पाटील (वय ६१) यांचे निधन झाले व त्यांचे मोठे भाऊ, माजी सरपंच सुहास पाटील यांचे वडील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना इंटकचे माजी अध्यक्ष पांडुरंग पाटील (७२) यांचे सोमवारी (दि.२४ मे) निधन झाले व जयसिंग पाटील यांचा मुलगा सुनील जयसिंग पाटील (२८) याचा मंगळवारी (दि.२५) कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या महामारीने अवघ्या २१ दिवसांत एकाच घरातील तिघांचा बळी घेतला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. अवघ्या २१ दिवसांत एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
कोरोचीत कोरोनाने घेतला एकाच घरातील तिघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST