शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Kolhapur updates- कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा निर्णय २४ तासांच्या आत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 13:00 IST

CoronaVirus Kolhapur updates- अन्य जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत मागे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा आदेश सात दिवसांचे अलगीकरण मात्र सक्तीचे

कोल्हापूर : अन्य जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत मागे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यात सर्वाधीक प्रमाण अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे आहे. यावर पर्याय काढत मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अन्य जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना तसेच जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात राहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ४८ तासांच्या आत आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याचा आदेश काढला होता.

ही चाचणी केलेल्या तसेच न करता परस्पर घरी गेलेल्या नागरिकांचे सात दिवस गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले होते. या सगळ्यावर ग्राम समिती व प्रभाग समितीचे नियंत्रण असेल असे आदेशात नमूद होते.मात्र बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला. या आदेशामुळे नागरिकांना अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने तो मागे घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापुरात विनासायास प्रवेश करता येणार आहे. मात्र राज्य शासनाच्या सध्याच्या नियमानुसार अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवसांचे अलगीकरण हा नियम कायम ठेवला आहे.गावांमध्ये तंट्याचे कारणचाचणी प्रमाणपत्र व परगावहून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही, त्यांचे संस्थात्मक किंवा गृह विलगीकरण करायचे  याचे सर्वाधिकार ग्राम व प्रभाग समित्यांना देण्यात आले होते. त्यामुळे हे वादाचे कारण ठरले असते. शिवाय एक- दोन दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय त्रासाचा ठरला असता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर