शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोरोना कमी; पण बेफिकिरीच जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:42 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आजच्या घडीला तरी ...

कोल्हापूर : कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आजच्या घडीला तरी कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग आवाक्यातच असल्याने घाबरण्याचे कारण नाही; पण नागरिकांची बेफिकिरी अशीच राहिली तर मात्र; हा आता दिसणारा १३ रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडूनच आदेश आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मास्कची कडक अंमलबजावणी व कारवाई सुरू केली असली तरी अजूनही नागरिक बेदरकारपणे विनामास्क फिरताना, गर्दी करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. लग्नसमारंभ धूमधडाक्यात, प्रचंड गर्दीत साजरे होत आहेत. कोरोना संपला आहे, असे समजूनच भाजीमंडईसह दुकानांमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी होताना दिसत आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हे फलक आता नावालाच उरल्यासारखी परिस्थिती असून, ग्राहक व विक्रेतेही बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर याचा विसर पडल्यासारखी स्थिती आहे.

या बेफिकिरीवर प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेकडून नाक्यावर विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची अधिकची कुमक लावली आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही लसीकरणाच्या प्रबोधनासह कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.