इचलकरंजी : बाहेरगावाहून बसेसमधून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची येथील थोरात चौक परिसरातील भगतसिंग उद्यानाजवळ कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये आठ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, सातजणांना शिक्के मारण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तसेच वाहनथांब्याच्या ठिकाणी तपासणीसाठी नगरपालिका, पोलीस व शहर वाहतूक पोलीस यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. तपासणी पथकांचे काम तीन सत्रांत सुरू राहणार आहे. रविवारी पाच बसेस इचलकरंजी शहरात दाखल झाल्या असून पुणे, बोरिवली, नाशिक, सुरत या ठिकाणांहून प्रवासी आले आहेत. आठ प्रवाशांची तपासणी केली असून, सातजणांना शिक्के मारण्यात आले आहेत. प्रशासनाने त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश दिले आहेत.
इचलकरंजीत प्रवाशांची कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST